जमिनीचा वाद भोवला; प्रेयसीनेच काढला प्रियकराचा काटा, मृतदेह घरातच पुरला

बिहारच्या पूर्णियामधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीची हत्या करून, घरातच त्याचा मृतदेह पलंगाखाली पुरण्यात आला होता . पोलिसांनी पुरलेल्या जागेवरून मृतदेह ताब्यात घेतला आहे. जमीनीच्या वादातून प्रेयसीनेच आपल्या प्रियकराला संपवल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

जमिनीचा वाद भोवला; प्रेयसीनेच काढला प्रियकराचा काटा, मृतदेह घरातच पुरला
भोजपुरी नायकाकडून पत्नीची गळा चिरून निर्घृण हत्या
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अजय देशपांडे

Dec 18, 2021 | 9:24 AM

पूर्णिया : बिहारच्या पूर्णियामधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीची हत्या करून, घरातच त्याचा मृतदेह पलंगाखाली पुरण्यात आला होता . पोलिसांनी पुरलेल्या जागेवरून मृतदेह ताब्यात घेतला आहे. जमिनीच्या वादातून प्रेयसीनेच आपल्या प्रियकराला संपवल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. प्रेयसीने प्रथम आपल्या प्रियकरावर चकूने वार केले, तो मृत झाल्याची खात्री होताच त्याचा मृतदेह आपल्याच घरात पलंगाखाली पुरला. संपत पासवान असे या हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

कुटुंबीयांना होता किडनॅपिंगचा संशय 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक आठवड्यापूर्वी शहरातील गुलाबबाग परिसरातील रहिवासी असलेला संपत पासवान हा गायब असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याला कोणीतरी किडनॅप केले असावे अशी शंका त्याच्या कुटुंबीयांकडून वर्तवण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. तपास सुरू असतानाच पोलिसांना संपत पासवान याची हत्या झाल्याचा सुगावा लागला. उपलब्ध पुराव्याच्या आधारे पोलिसांनी संपत पासवान याची प्रेयसी अशा देवीकडे संपतबाबत चौकशी केली. चौकशीदरम्यान तीने आपणच त्याची हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी अशा देवीच्या घरातून संपतचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. त्याचा खून करून त्याला पलंगाखाली पुरण्यात आले होते. संपत  याचे अशा देवीसोबत अनैतिक प्रेमसंबंध होते, अनैतिक प्रेमसंबंध आणि जमिनीच्या वादातून त्याची हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मोबाईल कॉलवरून हत्येचा उलगडा

संपत पासवान हा घरातून बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी  पोलीस ठाण्यात दाखल केली होती. तसेच त्याला कोणीतरी किडनॅप केले असावे अशी शंका देखील व्यक्त केली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. संपत गायब होण्याच्या पूर्वी कोणा, कोणाशी बोलला? त्याच्या मोबाईलचे लास्ट लोकेश काय होते, याची सर्व माहिती पोलिसांनी काढली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी अशा देवी या महिलेला ताब्यात घेतले होते. ही महिला संपत याची प्रेयसी असल्याचे चौकशीत समोर आले. तसेच जमीनीच्या वादातून आपणच त्याचा खून केल्याची कबुली या महिलेने दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती दिली.

 

संबंधित बातम्या

मुंबईत 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे ऑपरेशन ‘ऑल आऊट’; रस्त्यावर उतरत केली वाहनांची तपासणी

Nagpur | एम्सच्या संचालकांची बनावट इंस्टाग्राम आयडी!, सायबर गुन्हेगारानं लढवली शक्कल, वाचा काय आहे प्रकरण?

स्वस्त धान्याचा काळा बाजार; मुंबईत गोदामावर छापा, 25 लाखांचा धान्यसाठा जप्त

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें