AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्रीच येते आणि घंटी वाजवून जाते… कोण आहे ती रहस्यमयी महिला जिला पाहून जनावरेही पळतात?

ग्वाल्हेरमधील रहस्यमयी महिला रात्रीच्या वेळी घरांच्या घंटा वाजवून भीतीचे वातावरण निर्माण करत आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही महिला कैद झाली आहे. जनावरेही तिला पाहून घाबरतात. पोलिसांनी या प्रकरणी दखल घेतली असून, रात्रीची गस्त वाढवण्याचे आदेश दिले आहेत.

रात्रीच येते आणि घंटी वाजवून जाते... कोण आहे ती रहस्यमयी महिला जिला पाहून जनावरेही पळतात?
रात्रीच येते आणि घंटी वाजवून जाते... कोण आहे ती रहस्यमयी महिला ?Image Credit source: social media
| Updated on: Mar 25, 2025 | 2:15 PM
Share

मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरमधील लोक सध्या एका घटनेमुळे दहशतीखाली आहे. चार शहर परिसरात एक रहस्यमयी महिला दिसून आली आहे. पांढरे शुभ्र कपडे परिधान केलेली ही महिला फक्त रात्रीच्या वेळी येते. लोकांच्या घराची घंटी वाजवते आणि निघून जाते. तिला पाहून जनावरेही पळून जातात. रात्रीच्या किर्रर अंधारात ही महिला येत असल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सीसीटीव्हीत ही महिला कैद झाली आहे. त्यामुळे लोकांकडून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. ही महिला कोण आहे? ती कशासाठी येते? असे सवाल केले जात आहेत. ही महिला रात्रीच येत असल्याने लोक रात्रीच्यावेळी घराबाहेर पडण्यासही धजावत नाहीये.

एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही महिला दिसून येत आहे. ही महिला रात्रीच्यावेळी गल्लोगल्लीतून फिरते. लोकांच्या घराची डोअरबेल वाजवते. विशेष म्हणजे या महिलेला पाहून गायही पळताना दिसत आहे. जनावरही या महिलेला पाहून घाबरत असल्याने लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. स्थानिकांनीही हा सीसीटीव्ही पाहिला आहे. पण कुणालाही ही महिला कोण आहे? याची ओळख पटत नाहीये. तर काहींच्या मते कोणी तरी खोडसाळपणा करत आहे.

लोक घाबरले… चर्चांना उधाण

ही रहस्यमयी महिला ज्या पद्धतीने वावरत आहे, त्यामुळे लोकांमध्ये दहशत आहे. लोक घाबरले आहेत. अनेकांनी तर आपल्या मनातील भीती घालवण्यासाठी काली मातेची पूजा अर्चा सुरू केली आहे. पूर्वी आम्ही मोकाट जनावरांमुळे त्रस्त होतो. आता ही नवीन मुसीबत आली आहे. रात्री डोअरबेलचा आवाज ऐकून झोप उडते. त्यामुळे बाहेर कोण आहे? याचा विचार करूनच पोटात भीतीचा गोळा उठतो, असं एका स्थानिक रहिवाश्याने सांगितलं.

पोलिसांनी घेतली गंभीर दखल

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडे कोणतीही लिखित तक्रार आलेली नाही. पण व्हायरल फुटेज पाहून पोलिसांनी स्वत:हून याची गंभीर दखल घेतली आहे. आम्हाला याबाबत कोणतीही लिखित तक्रार ईला नाही. पण व्हिडीओच्या आधारे आण्ही ग्वाल्हेर पोलीस ठाण्याच्या प्रभारींना रात्रीची गस्त वाढवण्याचे आणि कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस या संदिग्ध महिलेचा शोध घेत आहे, अंस अतिरिक्त पोलीस अधीक्षक निरंजन शर्मा यांनी सांगितलं.

दरम्यान, यापूर्वी राजा मंडी परिसरात एक संदिग्ध महिला घराचे डोअरबेल वाजवत असल्याची तक्रार आली होती. त्यानंतर पोलिसांनी एका महिलेला अटक केली होती. मी एका घराचा शोध घेत आहे, असं या महिलेने त्यावेळी म्हटलं होतं. पण या नव्या घटनेने ग्वाल्हेरमधील लोक अधिक भेदरले आहेत. कारण या महिलेची ओळख पटलेली नाही आणि तिचा हेतूही समजलेला नाही.

राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.