AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उपराजधानी की क्राईम राजधानी? नागपुरात महिन्याला सरासरी 8 हत्या, तर 18 महिला अत्याचाराच्या घटना

हत्या, अत्याचार, चोरी, दरोडे, ब्लॅकमेलिंग अशा अनेक गुन्ह्यांमुळे नागपूर गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. त्यातच माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार नागपुरात महिन्याला सरासरी 8 हत्येच्या घटना घडत आहेत. तर महिल्यांवरील अत्याराच्या 18 गुन्हे घडत आहेत.

उपराजधानी की क्राईम राजधानी? नागपुरात महिन्याला सरासरी 8 हत्या, तर 18 महिला अत्याचाराच्या घटना
सांकेतिक फोटो
| Edited By: | Updated on: Jul 12, 2021 | 8:05 AM
Share

नागपूर : राज्याची उपराजधानी असलेलं नागपूर सध्या क्राईम राजधानी बनत असल्याचं पाहायला मिळत आहेत. कारण, एका माहिती अधिकारातून नागपूर शहरातील गुन्हेगारी जगताचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. हत्या, अत्याचार, चोरी, दरोडे, ब्लॅकमेलिंग अशा अनेक गुन्ह्यांमुळे नागपूर गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. त्यातच माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार नागपुरात महिन्याला सरासरी 8 हत्येच्या घटना घडत आहेत. तर महिल्यांवरील अत्याराच्या 18 गुन्हे घडत आहेत. (Shocking information on murders and rapes in Nagpur)

नागपूरमधील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहिती अधिकारातून नागपुरातील गुन्हेगारी जगताची माहिती समोर आणली आहे. 1 जानेवारी 2020 ते 31 मे 2021 या कालावधीत नागपुरातील हत्या, महिलांवरील अत्याचार, चोरी, सोनसाखळी चोरी, किडनॅपिंग अशा अनेक गुन्ह्यांची माहिती मागवली होती. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेनं दिलेल्या माहितीनुसार 2020 मध्ये नागपुरात महिला अत्याचाराच्या तब्बल 172 घटना समोर आल्या होत्या. तर 2021 च्या सुरुवातीच्या 5 महिन्यात हा आकडा 93 आहे. हत्येच्या घटनांची आकडेवारीही तितकीच धक्कादायक आहे. नागपुरात 2020 मध्ये 97 हत्या झाल्या होत्या. तर हा आकडा 2021 च्या सुरुवातीच्या 5 महिन्यात 41 इतका आहे.

नागपुरात चोरीच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. मागील वर्षात शहरात 2 हजार 66 चोरीचे गुन्हे नोंदवले गेले आहेत. तर 2021 च्या पाच महिन्यात 990 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. या आकडेवारीनुसार नागपुरात प्रत्येक महिन्याला सरासरी 198 चोरीच्या घटना घडत आहेत.

नागपूरच्या ड्रग्स तस्करांचं मुंबई कनेक्शन

नागपूर शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने तीन ड्रग्स तस्करांना अटक केली आहे. त्यांच्या जवळून 82 ग्रॅम 84 मिलीग्रॅम एमडी ड्रग्स पावडर जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या एमडी ड्रग्सची किंमत तब्बल 8 लाख 28 हजार 400 रुपये इतकी आहे. तीनही अटक आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारे या सर्वांना ड्रग्स पुरणावऱ्या मुंबई येथील मामू नावाच्या आरोपीला देखील अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी कारवाई कशी केली?

अंमली पदार्थ विरोधी पथकाला गुप्त बातमीदार कडून मिळाली होती की, गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दाभा नाका ते नविन काटोल नाका चौकाकडे रिंग रोडवर असलेल्या झोपडपट्टी भागात अंकित गुप्ता, रितीक गुप्ता आणि रूपम सोनकुसरे हे तीन ड्रग्सची विक्री करत आहेत. या माहितीच्या आधारे एनडीपीएसच्या पथकाने सापळा रचून तीनही आरोपींना शिताफीने अटक केली.

संबंधित बातम्या :

नागपूर पोलिसांना कडक सॅल्यूट, चोरीला गेलेले 116 मोबाईल केले परत

एटीएममधून हायटेक चोरी, सायबर गॅंगला नागपूर पोलिसांकडून जयपूरमध्ये अटक

Shocking information on murders and rapes in Nagpur

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.