नवजात बाळांना विकणारी टोळी अखेर गजाआड, 2.75 लाखात बाळाची विक्री, काय होती मोड्स ओपरेंडी?

नवजात बाळांना विकणारी टोळी अखेर गजाआड, 2.75 लाखात बाळाची विक्री, काय होती मोड्स ओपरेंडी?
CRIME

नवजात बालकांना विकणारी टोळींचा चंद्रपूर पोलिसांनी पर्दाफाश केलाय. याप्रकरणी चंद्रपूर आणि नागपूर अशा दोन ठिकाणी कारवाई करण्यात आली. आतापर्यंत एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

निलेश डाहाट

| Edited By: सिद्धेश सावंत

Jan 24, 2022 | 7:51 AM

चंद्रपूर : नवजात बालकांना विकणारी टोळी चंद्रपूर पोलिसांनी (Chandrapur Police) ताब्यात घेतली आहे. चंद्रपूर आणि नागपूर येथून 5 महिलांसह एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील दोन आरोपी महिला नागपुरात नर्स म्हणून काम करत असल्याचंही धक्कादायक वास्तव उघडकीस आलंय. चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात जन्म झालेल्या एका नवजात शिशूच्या आईला एचआयव्ही (HIV) असल्याचे खोटे सांगून बाळाला दूर करण्यात आलं होतं. नागपुरातील (Nagpur) एक स्वयंसेवी संस्था अशा वेगळ्या केलेल्या बाळाला सांभाळते, असा दावा नर्सनं बाळंत झालेल्या महिलेला केला होता. यानंतर दहा दिवसाचे बालक स्वतःपासून दूर गेल्याने संशय आलेल्या महिलेने पोलिसांना तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी तपास केल्यानंतर अखेर या संपूर्ण टोळीचं बिंग फुटलंय. पोलिसांनी 2 लाख 75 हजार रुपयांत नवजात बाळ विकल्याचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आणलंय. याप्रकरणी एकूण सहा संशयितांना अटक करण्यात आली असून पोलिस आता पुढील तपास करत आहेत. गेल्या काही दिवसांत नवजात बाळांच्या विक्रीप्रकरणी चंद्रपूरसह राज्याच्या वेगवेगळ्या भागात अनेक प्रकरणं उघडकीस आल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

काय होती मोड्स ऑपरेंडी?

नवजात बालकांना विकणारी टोळींचा चंद्रपूर पोलिसांनी पर्दाफाश केलाय. याप्रकरणी चंद्रपूर आणि नागपूर अशा दोन ठिकाणी कारवाई करण्यात आली. आतापर्यंत एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील दोन आरोपी महिला नागपुरात परिचारिका रुपात कार्यरत आहेत. तक्रार करणाऱ्या महिलेची शेजारी मीना चौधरी यातील मास्टमाईंड असल्याचे निष्पन्न झाले आहे.

चंद्रपूरच्या जिल्हा रुग्णालयात जन्म झालेल्या 10 दिवसीय बालकाच्या आईला आरोपी मीना चौधरी हिने एचआयव्ही असल्याचे खोटे सांगून तिच्यापासून बाळाला दूर केले. नागपुरातील एक स्वयंसेवी संस्था अशा वेगळ्या केलेल्या बाळाला सांभाळतात आणि त्यासाठी काही रक्कम पालकांना दिली जाते, असा दावा मीना चौधरीनं केलो हात. त्यानंतर व्यवहारही केला होता. हा व्यवहार संशयास्पद वाटल्याने दहा दिवसाचे बालक स्वतःपासून दूर गेल्याने आई कासावीस झाली. संशय बळावलेल्या आईनं अखेर पोलिसांना याबाबत तक्रार दिली.

चौकशीतून पर्दाफाश

पोलिसांनी सखोल चौकशीत हे 10 दिवसाचे बाळ चंद्रपूरच्याच एका महिलेला दोन लाख 75 हजार रुपयात विकल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आणले. पोलीस हा टोळीच्या अन्य दुव्यांचा तपास करीत आहेत. सध्या अटक करण्यात आलेल्या सर्वांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. बाळाच्या विक्रीप्रकरणी अशी याआधीही काही प्रकरणं या टोळीनं केलेली आहेत का, याचा आता तपास पोलिसांकडून केला जातो आहे.

संबंधित बातम्या :

पती गेला, तर दीर आणि सासऱ्याने घरात CCTV बसवले, पिंपरीत नेमकं काय घडतंय?

मुलीसोबत आईची गळफास लावून आत्महत्या, लातूर हादरलं; नेमकं कारण काय?

अल्पवयीन प्रेमीयुगुल पळून गेले; नागपुरात दोघांचाही मृत्यू, नेमकं कारण काय?


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें