Latur Crime | मुलीसोबत आईची गळफास लावून आत्महत्या, लातूर हादरलं; नेमकं कारण काय ?

Latur Crime | मुलीसोबत आईची गळफास लावून आत्महत्या, लातूर हादरलं; नेमकं कारण काय ?
जगावेगळ्या मैत्रीचा करूण अंत

जिल्ह्यातील नागलगाव शिवारात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एक आई आणि मुलीने (Mother and Daughter) शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केलीय. संगीता चव्हाण ( वय-35) असं आईचं नाव आहे आहे तर आत्महत्या केलेली मुलगी अल्पवयीन आहे.

महेंद्र जोंधळे

| Edited By: prajwal dhage

Jan 23, 2022 | 1:41 PM

लातूर : जिल्ह्यातील नागलगाव शिवारात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एक आई आणि मुलीने (Mother and Daughter) शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केलीय. संगीता चव्हाण ( वय-35) असं आईचं नाव आहे आहे तर आत्महत्या केलेली मुलगी अल्पवयीन आहे. उदगीर तालुक्यातील (Udgir Taluka) नागलगाव जवळील काशीराम तांडा इथं या मायलेकी राहत होत्या. दोघींनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. उदगीर ग्रामीण पोलिसांनी या मायलेकींच्या आत्महत्येप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

आई-मुलीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला 

मिळालेल्या माहितीनुसार संगीता चव्हाण आपल्या दोन मुलींना घेऊन शेतावर गेल्या होत्या. यामध्ये एक मुलगी घरी परतली मात्र दुसरी मुलगी आणि संगीता घरी परतल्याच नाहीत. त्यानंतर नातेवाईकांनी या दोघांची शोध घेतल्यानंतर त्यांचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. महिलेने मुलीला घेऊन आत्महत्या का केली, हे अद्याप समजू शकले नाही. मात्र या घटनेप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

सततच्या नापिकीला कंटाळून बुलडाण्यात महिला शेतकऱ्याची आत्महत्या

तर दुसरीकडे बुलडाण्यातदेखील सततच्या नापिकीला कंटाळून एका महिला शेतकऱ्याने आत्महत्या केली. विहिरीत उडी घेऊन महिलेने स्वत:ला संपवलं आहे. बुलडाणा जिल्ह्यातील अंढेरा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या रामनगर येथील यमुनाबाई तुकाराम मोढेकर वय 65 यांच्याकडे रामनगर शिवारात एक हेक्टर जमीन आहे. या जमिनीवर त्यांनी मेरा खुर्द येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे 50 हजार रुपये पीककर्ज घेतलेले आहे. शेतात उत्पन्न काढण्यासाठी महिलेचे सर्व कुंटुंब शेतातच वास्तव्यास आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे त्यांच्याकडून बँकेच्या घेतलेल्या पिककर्जाची परतफेड होऊ शकली नाही. याच कारणामुळे त्यांनी आत्महत्या केली.

इतर बातम्या :

Nashik Crime | दोन वेटरमध्ये वाद, नंतर तुंबळ हाणामारी, नाशकात हॉटेलमध्ये एकाचा मृत्यू

Gang rape| विधवा महिलेवरील सामूहिक बलात्काराच्या घटनेने शिरूर हादरले; 6 जणांना अटक  

Nagpur Crime | अल्पवयीन प्रेमीयुगुल पळून गेले; नागपुरात दोघांचाही मृत्यू, नेमकं कारण काय?


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें