भरधाव कारला धडकून नीलगाय ठार, गाडीचा पुढील भाग चक्काचूर

अमरावतीत भरधाव जाणाऱ्या एका कारसमोर अचानक आडव्या आलेल्या नीलगायीचाही धडक लागून मृत्यू झाला. ही घटना अमरावती चांदूर बाजार मार्गावर शिराळा नजीक घडली. ही धडक एवढी भीषण होती की कारचे दोन्ही एअरबॅग बाहेर आले.

भरधाव कारला धडकून नीलगाय ठार, गाडीचा पुढील भाग चक्काचूर
नीलगायीला धडकून कारचा अपघात
Follow us
| Updated on: Feb 25, 2022 | 1:09 PM

अमरावती : भरधाव कारला धडकून नीलगायीचा (Nilgai) मृत्यू झाला. या अपघातात गाडीचा पुढील भाग (Car Accident) चक्काचूर झाल्याचं पाहायला मिळत आहे. अमरावती (Amravati) जिल्ह्यात ही घटना घडली. गाडी आणि नीलगाय (रोही) यांची धडक इतकी जबरदस्त होती, की कारच्या पुढील काचांचा चुराडा झाला. वाहन चालक आणि त्याच्या बाजूच्या एअरबॅग्ज उघडल्यामुळे प्रवाशांचे प्राण बचावले. या अपघातात सुदैवाने कुठल्याही प्रवाशाला गंभीर इजा झाली नाही. मात्र गाडीला धडकलेल्या रोहीला आपला जीव गमवावा लागला.

नुकतंच उत्तर प्रदेशातील हापूड येथे धावत्या गाडीला आदळलेली नीलगाय पुढील भागाची काच तोडून आत शिरली होती. या भीषण अपघातातही नीलगायीचा तडफडून मृत्यू झाला होता.

नेमकं काय घडलं?

अमरावतीतही भरधाव जाणाऱ्या एका कारसमोर अचानक आडव्या आलेल्या नीलगायीचाही धडक लागून मृत्यू झाला. ही घटना अमरावती चांदूर बाजार मार्गावर शिराळा नजीक घडली. ही धडक एवढी भीषण होती की कारचे दोन्ही एअरबॅग बाहेर आले. सुदैवाने कारमधील कोणालाही गंभीर इजा झाली नाही.

वेगामुळे नीलगायीला धडक

अमरावती चांदुर बाजार महामार्गावरुन अमरावतीच्या दिशेने ही कार जात होती. परंतु याच दरम्यान रस्ता ओलांडताना एक मोठा नीलगाय (रोही) या कारला आडवी गेली. दरम्यान नीलगायीला वाचवण्यासाठी कार चालकाने अथक प्रयत्न केले. परंतु कारची गती अधिक असल्याने या कारची तिला धडक लागली.

धडकेनंतर दहा ते पंधरा फूट दूर फेकली गेलेली नीलगाय मृत्युमुखी पडली. कारचे दोन्ही एअरबॅग बाहेर आल्यामुळे कारमधील कुठल्याही प्रवाशाला गंभीर दुखापत झालेली नाही.

संबंधित बातम्या :

Amravati Accident | अमरावतीमध्ये खासगी बस नाल्यात पलटली! बसमध्ये 40 पेक्षा जास्त प्रवासी

नवी मुंबईतील उड्डाणपुलावर धावती कार पेटली, पंढरपूरच्या ‘देवदुताने’ पाच जणांच्या कुटुंबाला कसं वाचवलं?

नागपूर-अमरावती महामार्गावर कार ट्रेलरवर आदळली, पती-पत्नीसह पाच महिन्यांच्या मुलाचा मृत्यू

Non Stop LIVE Update
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
बारामतीनंतर शिरूरमध्ये तुतारीचा संभ्रम होणार? आयोगान कुणाला दिल चिन्ह?
बारामतीनंतर शिरूरमध्ये तुतारीचा संभ्रम होणार? आयोगान कुणाला दिल चिन्ह?.
खैरेंनी मुस्लिमांना सांगितल, 5 वेळा नमाज पडा; शिरसाटांनी व्हिडीओ लावला
खैरेंनी मुस्लिमांना सांगितल, 5 वेळा नमाज पडा; शिरसाटांनी व्हिडीओ लावला.
महाराष्ट्रातील नरेंद्र मोदींच्या सभांच्या झंझावातावर विरोधकांचा निशाणा
महाराष्ट्रातील नरेंद्र मोदींच्या सभांच्या झंझावातावर विरोधकांचा निशाणा.
महायुतीत मुंबईत 2 जागांवर सस्पेन्स, 'या' उमेदवारांची चर्चा, कधी घोषणा?
महायुतीत मुंबईत 2 जागांवर सस्पेन्स, 'या' उमेदवारांची चर्चा, कधी घोषणा?.
जप्तीनंतर भेट; लवकरच शरद पवार गटाच्या अभिजीत पाटलांचा भाजपात प्रवेश?
जप्तीनंतर भेट; लवकरच शरद पवार गटाच्या अभिजीत पाटलांचा भाजपात प्रवेश?.
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.