ऑफिसहून घरी जाताना काळाची झडप, ओव्हरटेकिंगच्या नादात ट्रकला धडक, कार चालकाचा मृत्यू

ऑफिसहून घरी जाताना काळाची झडप, ओव्हरटेकिंगच्या नादात ट्रकला धडक, कार चालकाचा मृत्यू
भंडाऱ्यात भीषण कार अपघात
Image Credit source: टीव्ही 9

आपले काम आटपून घरी निघालेल्या सनफ्लेग कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या कारने विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला समोरासमोर भीषण धडक दिली. या धडकेत कार चालकाचा मृत्यू झाला,

तेजस मोहतुरे

| Edited By: अनिश बेंद्रे

May 16, 2022 | 8:46 AM

भंडारा : आपले काम आटपून घरी निघालेल्या तरुणावर काळाने घाला घातला. सनफ्लेग कंपनीच्या कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाला. भंडारा जिल्ह्यात हा अपघात (Bhandara Accident) झाला. कर्मचाऱ्याच्या कारने ट्रकला समोरासमोर धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की कार चालकाचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. वरठी-सिरसी मार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना (Car Accident) घडली. रमेश कुमार टंडन असे मृत कर्मचाऱ्याचे नाव असून जखमींमध्ये भूरे नामक व्यक्तिचा समावेश आहे. विशेष म्हणजे हा अपघात ओव्हरटेक करण्याच्या नादात (Overtaking) घडल्याचे बोलले जात आहे.

आपले काम आटपून घरी निघालेल्या सनफ्लेग कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या कारने विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला समोरासमोर भीषण धडक दिली. या धडकेत कार चालकाचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या वरठी-सिरसी मार्गावर मध्यरात्री घडली आहे.

नेमकं काय घडलं?

रमेश कुमार टंडन नेहमीप्रमाणे आपली कंपनीतील रात्रपाळी आटोपुन रात्री 11 वाजता भंडारा येथील आपल्या निवासस्थानी आपल्या खाजगी कारने निघाले होते. त्यांच्यासोबत त्यांच्या एक कर्मचारी होता.

ओव्हरटेकच्या नादात अपघात

दरम्यान वरठी सिरसी मार्गावर ओव्हरटेक करत असताना समोरुन येणाऱ्या ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कारच्या समोरील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला.

हे सुद्धा वाचा

कार चालकाचा जागीच मृत्यू

या अपघातात कार चालक रमेश कुमार टंडन यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांचे सहकारी भूरे गंभीर जखमी आहेत. जखमीला भंडारा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आपल्या कंपनीतील कर्मचाऱ्याचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे इतर कर्मचाऱ्यांनी शोक व्यक्त केला आहे

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें