AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा हैदोस सुरुच, ट्रक-ट्रॅक्टरची जाळपोळ, एटापल्लीत दहशत

छत्तीसगड राज्यातून नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील हालेवारा परिसरात प्रवेश केला. दोन दिवसात दोन वेगवेगळ्या घटना घडवून आणल्यामुळे सध्या एटापल्ली तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे

गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा हैदोस सुरुच, ट्रक-ट्रॅक्टरची जाळपोळ, एटापल्लीत दहशत
गडचिरोलीत नक्षलींचा हैदोस, प्रातिनिधीक फोटोImage Credit source: टीव्ही 9
| Edited By: | Updated on: May 16, 2022 | 2:44 PM
Share

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात (Gadchiroli Crime News) मागील दोन दिवसांपासून नक्षलवाद्यांचा हैदोस (Naxal Attack) पाहायला मिळत आहे. आज (सोमवारी) पहाटे नक्षलवाद्यांनी हालेवारा परिसरात दोन पोकलेन, एक ट्रक आणि एक ट्रॅक्टरची जाळपोळ (Vehicles Set on Fire) केली. 14 तारखेच्या रात्री एका पोलीस खबऱ्याची नक्षलवाद्यांनी क्रूर पद्धतीने हत्या केल्याची घटना ताजी असतानाच हा प्रकार समोर आल्याने घबराट पसरली आहे.

नेमकं काय घडलं?

छत्तीसगड राज्यातून नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील हालेवारा परिसरात प्रवेश केला. दोन दिवसात दोन वेगवेगळ्या घटना घडवून आणल्यामुळे सध्या एटापल्ली तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे

सदर जाळपोळीत वाहनांचे मोठे नुकसान झाले असून जवळपास दोन कोटी रुपयांच्या वाहनांची नक्षलवाद्यांनी जाळपोळ केल्याचा आरोप केला जात आहे.

विरोधाचं कारण काय?

एटापल्ली भागात सुरजागड लोह खनिज प्रकल्प सुरु आहे. याच्या विरोधातही नक्षलवादी नेहमी कारवाया करताना अनेक वेळा जाळपोळ केली जाते. दोन वर्षानंतर पुन्हा जाळपोळीची घटना समोर आली आहे.

आत्मसमर्पित नक्षलवाद्याची कुऱ्हाडीने हत्या

गडचिरोलीतील आत्मसमर्पित नक्षलवाद्याची नक्षलवाद्यांनी कुऱ्हाडीने हत्या केल्याची घटना रविवारीच उघडकीस आली होती. नक्षल चळवळीतून फरार होऊन पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणाऱ्या तिम्मा मेंडी याची पोलीस खब-या असल्याच्या संशयाने नक्षलवाद्यांनी क्रूरतेने हत्या केली होती. एटापल्ली तालुक्यातील हालेवारा पोलिस स्टेशन मेंढरी अंतर्गत ही घटना घडली होती

भूसुरुंग स्फोट घडवण्याचे प्रयत्न

याआधी छत्तीसगडमधील बीजापूर जिल्ह्यात नक्षल पोलीस पथक ऑपरेशनवर निघाले असता पायदळी मार्गावर नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट पेरल्याचं गेल्या शुक्रवारी समोर आलं होतं. छत्तीसगड पोलिसांमार्फत महाराष्ट्र सीमावर्ती भागात नक्षलविरोधी पोलिस अभियान सुरू आहे. फुंडली बंगोली मार्गावर पोलीस ऑपरेशन करत असताना पाच-पाच किलोंचे दोन आयडी ब्लास्ट पोलिसांनी जप्त केले. या आयडी ब्लास्टला छत्तीसगड पोलिसांनी निकामी केलं होतं. महाराष्ट्र छत्तीसगड राज्यात जोडणारे अनेक रस्त्यांचे काम सुरू आहे या रस्त्यांना विरोध दर्शवत नक्षलवादी भूसुरुंग स्फोट आयडी ब्लास्ट लावत आहेत.

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.