दहा लाखांच्या खंडणीसाठी अल्पवयीन मुलाची हत्या, शेत शिवारात मृतदेह आढळला

गोंदिया जिल्ह्यात आमगाव तालुक्यात बंगावातील 17 वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली. दहा लाख रुपयांच्या खंडणीसाठी गळा आवळून त्याचा खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

दहा लाखांच्या खंडणीसाठी अल्पवयीन मुलाची हत्या, शेत शिवारात मृतदेह आढळला
Image Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Feb 24, 2022 | 7:40 AM

गोंदिया : दहा लाख रुपयांच्या खंडणीसाठी अल्पवयीन मुलाची हत्या (Minor Boy Murder) करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील (Gondia Crime) आमगाव तालुक्यात येणाऱ्या बंगावात हा प्रकार घडल्याची माहिती आहे. खंडणीचे पैसे मागत (Ransom) 17 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. गळा आवळून आरोपीने मुलाचा खून केल्याचं समोर आलं आहे. शेत शिवारात त्याची हत्या करण्यात आली होती, त्यानंतर त्याचा मृतदेह ढिगाऱ्याखाली लपवून ठेवण्यात आला होता. या प्रकरणी मध्य प्रदेशातून 24 वर्षीय तरुणाच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत.

काय आहे प्रकरण?

गोंदिया जिल्ह्यात आमगाव तालुक्यात बंगावातील 17 वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली. दहा लाख रुपयांच्या खंडणीसाठी गळा आवळून त्याचा खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

पोलिसांनी या प्रकरणी खंडणीची मागणी करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. आरोपीने अल्पवयीन मुलाची शेत शिवारात गळा आवळून हत्या करत मृतदेह तनसीच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवला होता.

नेमकं काय घडलं?

संबंधित 17 वर्षीय मुलगा मंगळवारी दुपारी आमगाव शहराला लागून असलेल्या रिसामा गावातील आपल्या मोठ्या आईकडे जाण्यासाठी निघाला असता. संध्याकाळ झाली तरी तो पोहोचला नसल्याने घराच्या लोकांनी शोधाशोध केली. त्यानंतर तो हरवल्याची तक्रार पोलिसांमध्ये देण्यात आली.

त्यानंतर आरोपीने तरुणाच्या कुटुंबियांना फोन केला आणि कॉलवर तब्बल दहा लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. याच नंबरच्या आधारे पोलिसांनी बुधवारी कारवाई केली.

मध्य प्रदेशातून मुसक्या आवळल्या

मध्य प्रदेश राज्यात नवेगाव खैरलांजी गावातील 24 वर्षीय दुर्गाप्रसाद हरिणखेडे याला ताब्यात घेत पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा आरोपीने आमगाव शहराला लागून असलेल्या शेत शिवार मुलाचा मृतदेह लपवून ठेवला असल्याची कबुली दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शव विच्छेदनासाठी पाठवले आहे. आमगाव पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

अपहरणकर्ता ऊसाच्या फडात लपला, धाडसी शेतकऱ्याने उभा फड जाळला, आरोपी कसा सापडला?

चित्रपट पाहून अपहरणाचा प्लॅन, रागाच्या भरात मित्रासोबत केलं भयंकर काम, दिल्लीमध्ये थरार

 बहिणीला पळवून नेण्याची धमकी, फोनवरुन सतत त्रास; अखेर तरुणाने उचलले मोठे पाऊल, नेमकं काय केलं ?

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.