AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CCTV | दुभाजक तोडून BMW विरुद्ध दिशेला, ट्रकवर धडकून कार उलटली, गोंदियात भीषण अपघात

दैव बलवत्तर असल्याने दोघे प्रवासी अपघातात सुखरुप राहिल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत. या भीषण अपघाताचा थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे.

CCTV | दुभाजक तोडून BMW विरुद्ध दिशेला, ट्रकवर धडकून कार उलटली, गोंदियात भीषण अपघात
गोंदियात अपघाताचा थरार
| Edited By: | Updated on: Feb 10, 2022 | 9:29 AM
Share

गोंदिया : बीएमडब्ल्यू कारचा भीषण अपघात (BMW Car Accident) झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातातून दोन वकील बालंबाल बचावले. गोंदिया जिल्ह्यातील देवरी शहरात (Gondia Accident) हा अंगाचा थरकाप उडवणारा अपघात घडला. BMW कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर ती दुभाजक तोडून विरुद्ध दिशेला गेली. एवढ्यावर न थांबता गाडी ट्रकला धडकली आणि पलटी झाली. या भीषण अपघाताचा थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद (CCTV) झाला आहे. कारमध्ये बसलेले दोघे जण या अपघातातून आश्चर्यकारकरित्या बचावले आहेत. रस्त्यावर वर्दळ कमी असल्याने मोठा अनर्थ टळलाच, शिवाय कारमध्ये बसलेले वकील आणि त्यांचा मित्रही किरकोळ जखमी झाले आहेत. नागपूरहून रायपूरच्या दिशेने जाताना हा अपघात घडला.

दैव बलवत्तर असल्याने दोघे प्रवासी अपघातात सुखरुप राहिल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत. या भीषण अपघाताचा थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे.

नेमकं काय घडलं?

नागपूरवरुन रायपूरला जाणाऱ्या वकिलाच्या BMW गाडीला भीषण अपघात झाला. गोंदिया जिल्ह्यात देवरी शहरातील जैन मंदिर चौकात हा अपघात झाला. कार अनियंत्रित झाल्याने चक्क डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेला गेली. तिथे उभ्या असलेल्या ट्रकला धडक देत बीएमडब्ल्यू कार पलटी झाली आहे.

जीवितहानी टळली

सुदैवाने या गाडीत बसलेले वकील आणि त्याचे मित्र किरकोळ जखमी झाले आहेत. याशिवाय रस्त्यावर वर्दळ नसल्याने मोठी जीवितहानीही टळली आहे. सीसीटीव्हीत कैद दृश्यांमधून या अपघाताची भीषणता लक्षात येते.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

कार पार्क करताना तरुणीचा अंदाज चुकला, दुसऱ्या मजल्यावरुन पडून गाडी पलटी, खाली उभी कार तर सपाटच

बाळाला दूध पाजत असतानाच भरधाव कारने चिरडलं, मुंबईत कुठे घडलं पुन्हा हिट एन्ड रन?

फिल्मी स्टाईलने गाडी घुसली किरणा मालाच्या दुकानात, चालक मद्यधुंद अवस्थेत; दुकानदारचं काय झालं

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.