AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपुरात ‘OYO’मध्ये अचंबित करणारे प्रकार; धाड टाकताच समोर जे आलं… सर्वजण झाले चकीत!

नागपूरमध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे. येथे मुलींकडून जबरदस्तीने देहविक्री व्यवसाय करून घेतला जात होता. पोलिसांनी टाकलेल्या धाडीत हे स्पष्ट झाले आहे.

नागपुरात 'OYO'मध्ये अचंबित करणारे प्रकार; धाड टाकताच समोर जे आलं... सर्वजण झाले चकीत!
nagpur sex racket
| Edited By: | Updated on: Apr 06, 2025 | 2:00 PM
Share

Nagpur Crime : भारतात देहविक्री कायद्याने गुन्हा आहे. मात्र आजदेखील अनेक ठिकाणी अवैधरित्या महिलांकडून देहविक्री व्यवसाय करून घेतला जातो. यात व्यवसायात अनेक महिला, तरुणींना ओढले जाते. एकदा या जाळ्यात फसलं की महिलांना नंतर यातून बाहेर येणे कठीण होऊन बसते. यातच अडकून राहिल्याने नंतर अनेक महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त होते. दरम्यान, नागपुरात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका ओयो हॉटेलमध्ये तरुणींकडून देहव्यवसाय करून घेतला जात असल्याचे समोर आले आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार नागपुरातील गिट्टीखदान भागात एका हॉटेलमध्ये काही तरुणींकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता. त्यासाठी मोठं रॅकेट काम करत होतं. विसेष म्हणजे या हॉटेलमध्ये ग्राहकांना हुक्कादेखील पुरवला जात होता. हा प्रकार समोर आल्यानंत पोलिसांनी हॉटेलवर धाड टाकली. पोलिसांच्या या कारवाईत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. येथून काही मुलींची सुटकादेखील करण्यात आली आहे. पोलिसांनी येथे काही आरोपींनाही अटक केलं आहे.

ओयो हॉटेलमध्ये नेमकं काय चालायचं?

पोलिसांनी या प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या तसेच हुक्का अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गिट्टीखदान पोलीस स्टेशनअंतर्गत एक ओयो हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये आपल्या आर्थिक फायद्यासाठी चार पीडित मुलींकडून देहव्यवसाय करून घेतला जात होता. ही माहिती समजताच पोलिसांनी थेट हॉटेलवर धाड टाकली. या कारवाईत एकूण दोन आरोपींना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने अटक केली आहे. कारवाईदरम्यान दोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत. पोलीस या दोघांचाही कसून शोध घेत आहेत. चेतन चकोले आणि युगांत दुर्गे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

2 मोबईल, हुक्कापॉट जप्त

पोलिसांनी हॉटेलवर धाड टाकल्यानंतर तेथे 4 पीडित मुलींकडून देहविक्री व्यवसाय करून घेतले जात असल्याचे आढळले. पोलिसांनी तत्काळ या चार मुलींची आरोपींच्या ताब्यातून सुटका केली. याच हॉटेलमध्ये ग्राहकांना पिण्यासाठी हुक्का पुरविण्यात येत असल्याचेही पोलिसांना आढळले. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून 2 मोबाईल, हुक्का पॉट व इतर साहित्य असा एकूण 86 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस पळून गेलेल्या दोन आरोपींचा कसून शोध घेत आहेत. तसेच या रॅकेटमध्ये आणखी कोण-कोण सामील आहेत, याचाही तपास पोलीस करत आहेत.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.