नागपुरातील ‘हंगामा डान्स’ प्रकरणात फास आवळला, पोलिसांनी आणखी 8 जणांना ठोकल्या बेड्या, पाळमुळं आणखी खोल ?

नागपुरातील ‘हंगामा डान्स’ प्रकरणात फास आवळला, पोलिसांनी आणखी 8 जणांना ठोकल्या बेड्या, पाळमुळं आणखी खोल ?
प्रातिनिधिक छायाचित्र

मिळालेल्या ताज्या माहितीनुसार या ‘न्यूड डान्स’ प्रकरणात आणखी आठ जणांना अटक करण्यात आलं आहे. यापूर्वी पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या होत्या. जिल्ह्यातील उमरेड पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

गजानन उमाटे

| Edited By: prajwal dhage

Jan 24, 2022 | 9:20 AM

नागपूर : जिल्ह्यात बैलगाडा शर्यतीच्या (Bullock Cart Race) नावाखाली अर्धनग्न महिलांचा डान्स (Women Dance) भरवण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. कुही, उमरेड तालुक्यातील काही गावांमध्ये डान्स हंगामाच्या नावाखाली दिवसा शंकरपट आणि रात्री शामियान्यात महिलांचा न्यूड डान्स असा किळसवाणा प्रकार सुरु होता. या बिभत्सतेचा एक व्हिडीओ समोर आल्यामुळे पोलिसांनी (Nagpur Police) कार्यक्रमाचे आयोजक तसेच डान्स करणाऱ्या महिलांवर कारवाई करणे सुरु केले आहे. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार या ‘न्यूड डान्स’ प्रकरणात आणखी आठ जणांना अटक करण्यात आलं आहे. यापूर्वी पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या होत्या. जिल्ह्यातील उमरेड पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

आणखी आठ जणांना बेड्या 

नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील मुसळगाव, भुगाव आणि सिल्ली तर उमरेड तालुक्यातील ब्राम्हणी या गावांमध्ये हंगामा डान्सचा कार्यक्रम भरवण्यात आला होता. यामध्ये महिला तसेच पुरुष अर्धनग्न होऊन अतिशय बिभत्सतेने डान्स करत होते. फक्त 100 रुपयांची फी देऊन तरुणांना हा अश्लिल डान्स पाहता येत होता. दिवसा बैलगाडा शर्यत तर रात्री अर्धनग्न महिलांचा डान्स असा कार्यक्रम या भागात थाटात सुरु होता. मात्र या डान्सचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर तीन आयोजकांना अटक केलं होतं. आता पोलिसांनी आपल्या तपासाला वेग दिला असून यामध्ये आणखी आठ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. नव्याने अटक करण्यात आलेल्यांची नावे समोर आलेली नाहीत. मात्र यामध्ये एलेक्स उर्फ हौरीशंकर बागडे यालाही अटक करण्यात आले आहे. आगामी काळात आणखी काही लोकांच्या अटकेची शक्यता आहे.

अशा प्रकारे रात्री हंगामा डान्स सुरु होता.

तीन आयोजक अडकले

दरम्यान, डान्स हंगामाचे आयोजन करणारे ब्राम्हणी येथील तीन जणांना यापूर्वी अटक करण्यात आलं. चंद्रशेखर मांढरे, सूरज नागपुरे आणि अनिल दमके अशी या आयोजकांची नावे आहेत. वृत्त प्रकाशित होताच ब्राम्हणी शिवारात पोलिसांनी चौकशी केली. सतरा जानेवारीला शंकरपट होते. यानिमित्त डान्स शोचे पत्रक लावण्यात आले होते. पत्रकात संपर्कासाठी मोबाईल नंबर दिला होता. या नंबरवर डान्स हंगामा बुकिंगसाठी संपर्क साधावा, असं लिहिलं होतं. यावरून पोलिसांनी आयोजकांशी संपर्क साधला.

इतर बातम्या :

Drug Smuggling | सात कोटी ड्रग्जची तस्करी, चक्क पोटात लपवल्या हेरॉईनच्या गोळ्या; बिंग नेमकं कसं फुटलं ?

MP: लग्नाचे रिसेप्शन, वऱ्हाड्यांचा डीजेवर ताल, अचानक तरुण कोसळला, मित्र म्हणाले नाटक करतोय; वाचा पुढे नेमकं काय घडलं?

Latur Crime : लातूरमध्ये बारावीच्या विद्यार्थ्याला धारदार हत्याराने भोसकले, हत्येचे कारण अस्पष्ट


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें