AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Crime : स्टॅमिना वाढवणाऱ्या गोळ्यांच्या अतिसेवनानं तरुणाचा मृत्यू! प्रेयसीसोबत लॉजवर असताना काय घडलं?

Nagpur News : मृत अजयच्या खिशातून स्टॅमिना (Stamina tablets) वाढवणाऱ्या गोळ्यांचा साठा मिळाला आहे.

Nagpur Crime : स्टॅमिना वाढवणाऱ्या गोळ्यांच्या अतिसेवनानं तरुणाचा मृत्यू! प्रेयसीसोबत लॉजवर असताना काय घडलं?
नागपुरातली धक्कादायक घटनाImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Jul 04, 2022 | 9:54 AM
Share

नागपूर : नागपूर (Nagpur crime News) जिल्ह्यातील सावनेर शहरात एक भयंकर घटना उघडकीस आली आहे. प्रेयसी सोबत लॉजमध्ये थांबलेल्या पंचवीस वर्षे तरुणाचा स्टॅमिना वाढवणाऱ्या गोळ्यांच्या अतिसेवनामुळे मृत्यू झालाय. यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. अजय परतेकी असे मृत तरुणाचे नाव असून काल संध्याकाळी तो सावनेर शहरातील केशव लॉज (Nagpur Keshav Hotel) मध्ये आपल्या प्रेयसी सोबत आला होता. दोघे ही आत गेल्यानंतर थोड्यावेळाने अजय आपल्या रूममध्ये बेशुद्धावस्थेत आढळला. घाबरलेल्या प्रेयसीने त्याच्या मित्रांना बोलावले आणि त्यानंतर त्यांनी पोलिसांना सूचना दिली. मृत अजयच्या खिशातून स्टॅमिना (Stamina tablets) वाढवणाऱ्या गोळ्यांचा साठा मिळाला आहे. या गोळ्यांच्या अतिसेवनामुळेच त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला जातोय.

नेमकं काय झालं 

अनेक अशा गोळ्या खाण्याच्या आगोदर त्याची माहिती नसल्याने अशा घटना घडत असतात. त्यातून तरूणाचा मृत्यू झाल्याचा पोलिसांना संशय आहे. नागपूर जिल्ह्यातून रोज क्राईमच्या घटना घडत असतात. पण सध्या घडलेल्या घटनेमुळे अवघ्या नागपूरात चर्चा आहे. हा तरूण त्याच्या प्रेयसीसोबत एका लॉजमध्ये गेला.

त्यावेळी त्याने स्टॅमिना वाढवणाऱ्या गोळ्या सोबत ठेवल्या होत्या. त्याने त्या अधिक गोळ्या खाल्ल्या त्यामुळे बेशुद्ध झाला. त्यानंतर घाबरलेल्या तरूणीने ही माहिती तात्काळ तिथल्या हॉटेल व्यवस्थापकाला दिली. त्याने ही माहिती पोलिसांना दिली.

पोलिस शवविच्छेदन अहवालाच्या प्रतिक्षेत

शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर खरी माहिती बाहेर असा पोलिसांना विश्वास आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार त्यांच्या खिशात स्टॅमिना वाढवणाऱ्या गोळ्या सापडल्या आहेत. तरूणाने किती गोळ्या खाल्ल्या होत्या? त्या कोणत्या कंपनीच्या होत्या? तसेच त्याला गोळ्या खाण्याचा सल्ला कोणी दिलाा होता का? या सगळ्या गोष्टींची चौकशी पोलिस करणार आहेत.

त्याचबरोबर पोलिसांनी लॉजमधील काही संशयास्पद वस्तू ताब्यात घेतल्या आहेत. संबंधित तरूणी घाबरली असून तिची देखील चौकशी कसून चौकशी करण्यात येणार आहे. हा हत्येचा प्रकार तर नाही ना, याचाही आता कसून तपास केला जातोय.

मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.