AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तीन लाखांचा नायलॉन मांजा जप्त ; संक्रातीच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांची कारवाई

मकर संक्रातीच्या पार्श्वभूमीवर  मोठ्याप्रमाणात नायलॉनचा मांजा नागपुरात विक्रीसाठी येत आहे. नागपूर पोलिसांनी एका ट्रान्सपोर्ट कंपनीच्या माध्यमातून शहरात आलेला जवळपास तीन लाख रुपयांचा मांजा जप्त केला आहे. 

तीन लाखांचा नायलॉन मांजा जप्त ; संक्रातीच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांची कारवाई
भोजपुरी नायकाकडून पत्नीची गळा चिरून निर्घृण हत्या
| Edited By: | Updated on: Dec 20, 2021 | 1:40 PM
Share

नागपूर : नायलॉनच्या मांजावर बंदी असताना देखील पंतगासाठी सर्रासपणे त्याचा उपयोग होतो. अशाप्रकारच्या मांजामुळे अनेक अपघाताच्या घटना घडतात त्यामुळे या मांजाचा वापर व विक्रीला प्रतिबंध करण्यात आला आहे. मात्र तरी देखील अवैधपद्धतीने या मांजाची खरेदी विक्री सरूच आहे. मकर संक्रातीच्या पार्श्वभूमीवर  मोठ्याप्रमाणात नायलॉनचा मांजा नागपुरात विक्रीसाठी येत आहे. नागपूर पोलिसांनी एका ट्रान्सपोर्ट कंपनीच्या माध्यमातून शहरात आलेला जवळपास तीन लाख रुपयांचा मांजा जप्त केला आहे.

तीन लाखांचा मांजा जप्त

मकर संक्रात हा पंतगाचा उत्सव मानला जातो. या काळात मोठ्याप्रमाणात पंतगबाजी केली जाते. मात्र पंतगासाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉनच्या मांजामुळे अनेक अपघात घडत असता, या अपघातामुळे अनेकांनी जीव देखील गमवला आहे. तसेच पक्षी देखील जखमी होतात. त्यामुळे या मांजावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र बंदी असताना देखील शहरात सर्रासपणे या मांजाची विक्री होते. या विक्रीला आळा घालण्यासाठी आता पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. शहरात नायलॉनचा मांजा येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईत तीन लाखांचा मांजा जप्त करण्यात आला आहे.

नायलॉनचा मांजा न वापरण्याचे आवाहन

दरम्यान नायलॉनचा मांजा अनेक अपघाताला कारणीभूत ठरतो, त्यामुळे त्याच्यावर बंदी घालण्यात आली आहे. जर तुम्हाला शहरात कुठेही अवैध पद्धतीने नायलॉनचा मांजा विक्री होत असल्याचे आढळून आल्यास तातडीने त्याची माहिती पोलिसांना द्यावी. असे आवाहन शहर पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या 

Chain Snatcher | आधी महागड्या बाईक उचलायच्या, मग त्यावरुनच ‘धूम’ स्टाईल चोरी, कल्याणमध्ये चोर अटकेत

भरधाव स्कार्पिओने चार जणांना चिरडले; दोन सख्या बहिणींचा मृत्यू

Cyber crime: सिमकार्ड बंद पडले म्हणून आला फोन, औरंगाबादच्या महिला वकिलाला 86 हजार रुपयांना गंडवले

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.