AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेमडेसिव्हीर काळाबाजार प्रकरणात महाराष्ट्रात पहिलीच शिक्षा, वॉर्डबॉयला 3 वर्ष सश्रम कारावास

महेंद्र रतनलाल रंगारी असे 28 वर्षीय वॉर्डबॉयचे नाव आहे. तो नागपूरच्या रंगारी चौकातील एका कोव्हिड सेंटरमध्ये कामाला होता. महेंद्र रेमडेसीव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार करत होता.

रेमडेसिव्हीर काळाबाजार प्रकरणात महाराष्ट्रात पहिलीच शिक्षा, वॉर्डबॉयला 3 वर्ष सश्रम कारावास
remdesivir injection
| Edited By: Anish Bendre | Updated on: Jul 24, 2021 | 2:22 PM
Share

नागपूर : रेमडेसिव्हीर काळाबाजार प्रकरणात (Remdesivir Injection Black Market) महाराष्ट्रात पहिलीच शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपी वॉर्डबॉयला 3 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा विशेष न्यायालयाने ठोठावली. नागपुरात एप्रिल 2021 मध्ये महेंद्र रंगारी कोरोनाग्रस्त रुग्णाचे रेमडेसिव्हीर इंजेक्शन चोरून विकल्याचा आरोप आहे.

तपास तीन महिन्यांत पूर्ण

महेंद्र रतनलाल रंगारी असे 28 वर्षीय वॉर्डबॉयचे नाव आहे. तो नागपूरच्या रंगारी चौकातील एका कोव्हिड सेंटरमध्ये कामाला होता. महेंद्र रेमडेसीव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार करत होता. 17 एप्रिल 2021 रोजी हुडकेश्वर पोलिसांनी महेंद्रवर गुन्हा नोंदवला होता. उच्च न्यायालयाने या प्रकरणाला गांभीर्याने घेऊन फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण चालवण्याचे आदेश दिले होते. याचा तपास तीन महिन्यांत पूर्ण होऊन शुक्रवारी निकाल लागला. या प्रकरणी मुख्य न्यायदंडाधिकारी एस. बी. पवार यांच्या समक्ष सुनावणी झाली.

नेमकं काय घडलं?

महेंद्र काम करत असलेल्या कोव्हिड सेंटरमध्ये संबंधित कोरोनाग्रस्त महिलाही दाखल होती. तिला रेमडेसिव्हीरची आवश्यकता असल्याने कुटुंबीयांनी इंजेक्शनची व्यवस्था केली होती. 17 एप्रिल 2021 रोजी संध्याकाळच्या सुमारास महिला स्वच्छतागृहातून परत आली, तेव्हा तिला टेबलवर ठेवलेले इंजेक्शन गायब दिसले.

सीसीटीव्हीमध्ये पर्दाफाश

महिलेले लगेचच कोव्हिड सेंटरच्या प्रमुखाकडे तक्रार केली. या प्रकरणी पोलिसात चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु करण्यात आला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज तपासले असता वॉर्डबॉय महेंद्र रेमडेसिव्हीर इंजेक्शन चोरुन नेताना दिसला. त्यानुसार हुडकेश्वर पोलिसांनी महेंद्रवर गुन्हा नोंदवत त्याला अटक केली होती.

तपासानंतर पोलिसांनी आरोपी महेंद्र रंगारी याच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. न्यायालयात आरोपी महेंद्रवर चोरीचा गुन्हा सिद्ध झाल्याने मुख्य न्यायदंडाधिकारी एस. बी. पवार यांनी त्याला तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

संबंधित बातम्या :

रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या नावाखाली फसवणूक, 60 लाख रुपये जप्त, 6 जणांना बेड्या, मुंबई पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

मिरजच्या अपेक्स हॉस्पिटलमध्ये गुन्ह्यांची मालिका, रेमडेसिव्हीरचा काळा बाजार, एकाला अटक

(Remdesivir Injection Black Market Nagpur Ward boy gets three years of imprisonment)

Follow Us
शिंदे सेनेत प्रवेश...थेट उपसभापती! अहिरांच्या नावावर शिक्कामोर्तब
Vidhanparishad | शिंदे सेनेत प्रवेश... आणि थेट उपसभापती! सचिन अहिरांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब
ठाकरे गटाला पुन्हा मोठा दणका? विश्वासू नेत्यासह... राज्यातील राजकारणात
ठाकरे गटाला पुन्हा मोठा दणका? विश्वासू नेत्यासह... राज्यातील राजकारणात मोठी खळबळ
शिंदेंच्या सेनेत जाण्याआधीच सचिन अहिरांची पहिली प्रतिक्रिया
Sachin Ahir | मी गेल्याशिवाय कळणार नाही...शिंदेंच्या सेनेत जाण्याआधीच सचिन अहिरांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला? श्रीकांत शिंदे
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला? श्रीकांत शिंदेंसह ओमराजेदेखील... राजकारणातील हालचाली वाढल्या
आजपासून लागू झाले 11 नियम! बँक, ITR, HSRP...अपडेट्स एका क्लिकमध्ये
New Rules | आजपासून लागू झाले 11 मोठे नियम! बँक, ITR, पासपोर्ट, HSRP ते LPG... सर्व अपडेट्स एका क्लिकमध्ये
सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा
सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा अर्ज दाखल करताच, सरकारने थेट....
सर्व काही दिलं... तरी पक्ष सोडला! अहिरांवर राऊतांचा संताप
Sanjay Raut Full Press | सर्व काही दिलं... तरी पक्ष सोडला! विश्वासाला तडा देणाऱ्यांना जनता ओळखते; अहिरांवर राऊतांचा संताप
महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना दिलासा! इराण-अमेरिकेतील
महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना दिलासा! इराण-अमेरिकेतील कराराचा भारतीयांना थेट फायदा; आता पेट्रोल...
“मी आधीच चार खून केलेत, पुढचा नंबर...” मुंबई लोकलमध्ये सनकी व्यक्तीचा
“मी आधीच चार खून केलेत, पुढचा नंबर...” मुंबई लोकलमध्ये सनकी व्यक्तीचा धिंगाणा; मद्यधुंद अवस्थेत... पुढे भयंकर घडलं?
शरद पवारांचे झाले नाहीत, आमचे काय होणार?; राऊतांचा अहिरांवर घणाघात
Sanjay Raut | शरद पवारांचे झाले नाहीत, आमचे काय होणार?; राजकीय प्रवास कलंकित, राऊतांचा सचिन अहिरांवर घणाघात