नागपूर : परराज्यातील मुलींना पैशाचं आमिष दाखवत त्यांना नागपुरात आणून ओयो हॉटेलमध्ये देह व्यापाऱ्याचा धंदा करणाऱ्या रॅकेट (Racket)चा नागपूर गुन्हे शाखा पोलिसांनी पर्दाफाश (Busted) केला आहे. सदर परिसरात टाकलेल्या धाडीत एका मुलीला सुटका करण्यात आली तर एका आरोपीला अटक (Arrest) करण्यात आली आहे. रोशन डोंगरे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने याआधी सुद्धा अनेक राज्यातील मुलींना आणून अशाप्रकारे व्यवसाय केल्याचं पुढे येत आहे. ओयो हॉटेल हे अशा लोकांसाठी एक ठिकाण बनलं असल्याचं सुद्धा पुढे येत आहे यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे.