AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Crime : चोवीस तासात तीन हत्यांनी नागपूर हादरले, गुन्हेगारी रोखण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान

नागपूरमध्ये हत्येचे सत्र थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. गेल्या 24 तासात तीन हत्याकांडाने नागपूर पन्हा एकदा हादरले आहे. वाढते हत्यासत्र रोखणे पोलिसांसमोर आव्हान आहे.

Nagpur Crime : चोवीस तासात तीन हत्यांनी नागपूर हादरले, गुन्हेगारी रोखण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान
नागपुरात 24 तासात तीन हत्या
Follow us
| Updated on: Aug 21, 2023 | 10:07 PM

नागपूर / 21 ऑगस्ट 2023 : उपराजधानीत हत्येचे सत्र थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. गेल्या 24 तासात तीन हत्या झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. जरीपटक्यात मजुराचा, यशोधरा नगर भागात एका गुन्हेगाराचा तर 12 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका ट्रक चालकाची हत्या झाली आहे. महेशकुमार उईके, बादल पडोळे आणि मेहबूब खान अशी मृतकांची नावे आहेत. अनैतिक संबंधातून आणि अंतर्गत वादातून या हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. वाढत्या हत्येच्या घटना पाहता पोलिसांचा गुन्हेगारांवर वचकच राहिला नसल्याचे दिसून येते. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी ठोस पावले उचलावी अशी नागरिकांची मागणी आहे.

अनैतिक संबंधावरुन झालेल्या वादातून एकाची हत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेशकुमार हा कमलेश भलावी नामक व्यक्तीसोबत दारु पित बसला होता. यावेळी कमलेश याचे राजकुमारी नामक महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे महेशकुमारने म्हटले. याचा राग आल्याने दोघांमध्ये भांडण झाले. यावेळी राजकुमारी आणि तिचा प्रियकर करणही तेथे आला. त्या दोघांनीही महेशकुमारला शिवीगाळ आणि मारहाण केली. या मारहाणीत जखमी महेशकुमारचा मृत्यू झाला.

पूर्ववैमनस्यातून तरुणाची हत्या

दुसरी घटना यशोधरानर परिसरात घडली. पूर्ववैमनस्यातून बादल पडोळे या तरुणाची हत्या करण्यात आली. रविवारी सायंकाळी बादल आणि आरोपी चेतन सूर्यवंशी हे दोघे एकत्र आले होते. तेथे त्यांच्यातील जुना वाद उफाळून आला. रागाच्या भरात चेतने बादलवर धारदार शस्त्राने हल्ला केला. यानंतर चेतन पसार झाला. यशोधरा पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी बादलला रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. पोलिसांनी आरोपी चेतनविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

हे सुद्धा वाचा

क्षुल्लक वादातून साथीदारांनीच चालकाला संपवले

तिसऱ्या घटनेत जरीपटाका पोलीस ठाण्याअंतर्गत एका चालकाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. सदर मृतदेह ताब्यात घेत त्याचा तपास केला असता घटनेचा उलगडा झाला. मेहबूब खान असे मयत चालकाचे नाव आहे. क्षुल्लक वादातून त्याच्या दोन साथीदारांनी त्याची हत्या केली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

बुध-सूर्य संक्रमण होणार; येणारे १६ दिवस संकटांनी भरलेले असतील!
बुध-सूर्य संक्रमण होणार; येणारे १६ दिवस संकटांनी भरलेले असतील!.
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड.
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती.
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?.
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त.
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना....
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना.....