Nagpur Crime : नागपुरात उच्चशिक्षित युवतीकडून दुचाकींची चोरी, अशी फसली पोलिसांच्या जाळ्यात

नागपूरच्या सीताबर्डी मार्केटचा परिसर म्हणजे अतिशय गजबजलेला परिसर. याच गर्दीच्या परिसरातून ही 21 वर्षीय तरुणी दुचाकी चोरायची. डुप्लीकेट चावीच्या सहाय्याने ती दुचाकी घेऊन पसार व्हायची. आतापर्यंत तिने अशा प्रकारे तीन दुचाकी चोरुन नेल्या आहेत.

Nagpur Crime : नागपुरात उच्चशिक्षित युवतीकडून दुचाकींची चोरी, अशी फसली पोलिसांच्या जाळ्यात
नागपुरात उच्चशिक्षित युवतीकडून दुचाकींची चोरी
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 8:51 PM

नागपूर : नागपूरमधील सीताबर्डी परिसरातील दुचाकी (Two Wheeler) चोरीच्या घटनांचा उलगडा करण्यास पोलिसांना यश आले आहे. आरोपीची माहिती मिळताच पोलिसही चक्रावून गेले. एक उच्चशिक्षित तरुणी (Young Girl) दुचाकी चोरी करीत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. या तरुणीने आतापर्यंत तीन दुचाकींची चोरी केली आहे. परिसरातील सीसीटीव्हीच्या सहाय्याने पोलिसांनी आरोपी तरुणीला अटक केली आहे. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी तरुणीला अटक केली आहे. चोरीच्या गुन्ह्यात तरुणीसोबत आणखी कुणी सहभागी आहे का याचा पोलिस शोध घेत आहेत. मात्र सुशिक्षित असूनही ही तरुणी हे काम का करीत होती हे अद्याप कळू शकले नाही. (Two-wheeler stolen from a highly educated girl in Nagpur, Arrested by police, More investigations underway)

गजबजलेल्या परिसरातून दुचाकी चोरायची

नागपूरच्या सीताबर्डी मार्केटचा परिसर म्हणजे अतिशय गजबजलेला परिसर. याच गर्दीच्या परिसरातून ही 21 वर्षीय तरुणी दुचाकी चोरायची. डुप्लीकेट चावीच्या सहाय्याने ती दुचाकी घेऊन पसार व्हायची. आतापर्यंत तिने अशा प्रकारे तीन दुचाकी चोरुन नेल्या आहेत. या परिसरातून वाहन चोरीच्या तक्रारी पोलिसांकडे येत होत्या. यामुळे पोलिसांनी या परिसरात लक्ष केंद्रित केले होते. बर्डीच्या मेट्रो स्टेशनजवळून एक दुचाकी चोरी झाली होती. याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. या फुटेज पोलिसांना एक संशयित तरुणी आढळली. पोलिसांनी तिचा शोध घेऊन तिला ताब्यात घेतले. त्यानंतर तिची कसून चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. ही तरुणी आपले शौक पूर्ण करण्यासाठी की पैसे कमवण्यासाठी ही चोरी करीत होती याबाबत पोलिस चौकशी करीत आहेत.

अहमदनगरमध्ये माजी सैनिकाच्या घरी चोरी

अहमदनगरला श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी वांगदरी येथे सेवानिवृत्त माजी सैनिकाचे घर फोडून धाडसी चोरी झालीय. सुमारे 15 तोळे सोने आणि रिव्हाल्वर चोरुन नेल्याने एकच खळबळ उडाली आहे. माजी सैनिक जालिंदर रामदास पाचपुते यांच्या घरी चोरी झाली आहे. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. पाचपुते हे गावचा आठवडे बाजार असल्यामुळे गावात बाजारला आले होते. तर घरातील महिला शेतातील काम करण्यासाठी शेतावर गेल्या होत्या. त्यामुळे घरी कोणी नसल्याचा गैरफायदा घेऊन अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजे आणि कुलपे कटावणीने तोडून घराच्या कपाटातील सुमारे 15 तोळे सोन्यासह नितृत्ती नंतर स्वतःच्या संरक्षणासाठी घेतलेली रिव्हाल्वर चोरीला गेली. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. (Two-wheeler stolen from a highly educated girl in Nagpur, Arrested by police, More investigations underway)

इतर बातम्या

Lalu Prasad Yadav : चारा घोटाळा प्रकरण : लालू प्रसाद यादवांसह इतर 37 जणांच्या शिक्षेचा उद्या फैसला

Shweta Mahale : भाजप आमदार श्वेता महालेंसह अनेकांवर गुन्हे दाखल, विनापरवानगी मोटारसायकल रँली काढल्याप्रकरणी कारवाई

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.