AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपूरमध्ये महिला चोरांचा सुळसुळाट, ज्वेलर्सच्या दुकानात मोठ्या चालाखीत दागिने लांबविले, सीसीटीव्हीत घटना कैद

नागपूर शहरात महिला ज्वेलर्स दुकानातून दागिन्यांची चोरी करत असल्याच्या घटना पुढे येत आहेत. हात सफाई करत आतापर्यंत या महिलांनी दोन ज्वेलर्स दुकानातून सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली. या महिलांना पकडण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजमधील फोटो व्हायरल केले.

नागपूरमध्ये महिला चोरांचा सुळसुळाट, ज्वेलर्सच्या दुकानात मोठ्या चालाखीत दागिने लांबविले, सीसीटीव्हीत घटना कैद
| Edited By: | Updated on: Oct 28, 2021 | 6:51 PM
Share

नागपूर : नागपूर शहरात महिला ज्वेलर्स दुकानातून दागिन्यांची चोरी करत असल्याच्या घटना पुढे येत आहे. हात सफाई करत आतापर्यंत या महिलांनी दोन ज्वेलर्स दुकानातून सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली. या महिलांना पकडण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजमधील फोटो व्हायरल केले आहेत. नागपूर शहरातील बजाज नगर पोलीस ठाणे हद्दीमध्ये दोन चोरीच्या घटना समोर आल्या आहेत. यामध्ये 22 ऑक्टोबरला नागपूरमधील श्रद्धानंद पेठमधील तनिष्क ज्वेलरीमध्ये 40 ते 45 वयोगटातील दोन महिला नऊ वर्षाच्या मुलासोबत आल्या आणि त्यांनी दीड लाखाच्यावर किंमत असलेल्या सोन्याच्या बांगड्या हात सफाईने चोरुन नेल्या.

विशेष म्हणजेच पहिल्या घटनेनंतर सलग दुसऱ्या दिवशी 23 ऑक्टोबरला देखील चोरीची घटना समोर आली. नागपूरच्या बजाजनगरच्या वेस्ट हायकोर्ट रोडवरील वामन हरी पेठे ज्वेलर्स या ठिकाणी 35 ते 40 वयोगटातील दोन महिला लहान मुलासोबत आल्या होत्या. या महिलांनी हात सफाईने दागिन्यांची चोरी केली. हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. त्यातूनच या महिलांचे फोटो काढत पोलिसांनी व्हायरल केले आहेत.

पोलिसांनी लोकांना आणि ज्वेलर्सना आवाहन केले आहे की, या महिला दिसल्यास नागपूर पोलिसांना त्याची माहिती द्यावी. ही चोरी करणारी महिलांची टोळी आंतरराज्यीय असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्याचा तपास पोलीस करत आहेत.

भिवंडीतही ज्वेलर्सच्या दुकानात चोरी

दोन दिवसांपूर्वी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरातदेखील अशीच काहिशी घटना समोर आली होती. भिवंडीत एका ज्वेलर्सच्या दुकानात दोन बुरखा परिधान केलेल्या महिला आल्या होत्या. त्यांनी ज्वेलर्सच्या दुकानातील कामगारांना बोलण्यात गुंतवत सोन्याच्या दोन बांगड्या चोरी केल्या होत्या. त्यानंतर त्या मोठ्या चालाखीने पळून गेल्या होत्या. घटनेनंतर दोन दिवसांनी ज्वेलर्स मालकाला हा प्रकार समजला होता. त्यांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासात याबाबत खात्री केली होती.

मुंबईतून बुलेट चोरी, अमरावतीत विक्री, सराईत बाईकचोराला बेड्या

मुंबईतील अंधेरी पूर्वेकडील एमआयडीसी परिसरात सिप्झ कंपनीच्या समोर रस्त्यावर पार्किंग केलेल्या बुलेट बाईक चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला एमआयडीसी पोलिसांनी बेड्या ठोकला आहेत.

काय आहे प्रकरण?

मुंबईत कोरोना काळात खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रेल्वेने प्रवास करण्यासाठी परवानगी नव्हती. मुंबईत काम करणारे कर्मचारी आपापल्या खासगी गाड्या घेऊन कामावर जायचे, मात्र अंधेरी पूर्वेत एमआयडीसी परिसरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सिप्झ कंपनीच्या आतमध्ये जागा नसल्यामुळे समोरच्या रस्त्यावर आपल्या दुचाकी गाड्या पार्किंग करायचे.

चोरी सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद

या पार्किंग मधून एमआयडीसी परिसरात राहणारा अब्दुल कादर सलीम (वय चाळीस वर्ष) या सराईत चोरट्याने बुलेट बाईक चोरी करतानाचे दृश्य तिथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले होते. या सीसीटीव्ही फुटेज साधाराने एमआयडीसी पोलिसांनी या सराईत चोरट्याला अमरावतीमधून अटक केली आहे.

संबंधित बातम्या :

मुलाचा वियोग, पत्नी-सासूचा जाच, रडत मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड, 30 वर्षीय तरुणाची आत्महत्या

आधी भावाचा हार्ट अटॅकने मृत्यू, आता पाळीव बैलाचा बापलेकावर हल्ला, आठवड्याभरात दोन आधार हरपले

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.