मुलाचा वियोग, पत्नी-सासूचा जाच, रडत मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड, 30 वर्षीय तरुणाची आत्महत्या

माझ्या मुलाला हिसकावून खूप मोठी चूक केलीस, आपल्यातील सर्व संबंध तोडलेस, मी आई-वडिलांना सोडून तुझ्याकडे आलो होतो, मात्र आता मला कुठलाच आधार उरला नाही' असं इम्रान केविलवाण्या स्वरात म्हणाला.

मुलाचा वियोग, पत्नी-सासूचा जाच, रडत मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड, 30 वर्षीय तरुणाची आत्महत्या
प्रातिनिधीक फोटो

लखनौ : उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये मुलाचा वियोग सहन न झाल्याने एका तीस वर्षीय तरुणाने राहत्या घरी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने पत्नीने आपल्याला दिलेल्या मानसिक त्रासाची कहाणी रडत रडत मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांना त्याने गळफास घेतल्याची माहिती मिळाली.

काय आहे प्रकरण?

बहराइच जिल्ह्यातील सिटी कोतवाली पोलिसांच्या हद्दीत बशीरगंज भागातही घटना घडली. 30 वर्षीय इम्रानने पत्नीकडून झालेला मानसिक जाचाची कहाणी 25 ऑक्टोबरच्या रात्री आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड केली. त्यानंतर त्याच खोलीत पंख्याला गळफास घेऊन आयुष्याची अखेर केली.

काय आहे व्हिडीओमध्ये?

इम्रानने आपल्या पत्नीला उद्देशून भावनिक व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. ‘नाझिया, तू खूप चुकीचे केलेस, तू माझ्यापासून माझ्या मुलाला हिसकावून खूप मोठी चूक केलीस, आपल्यातील सर्व संबंध तोडलेस, मी आई-वडिलांना सोडून तुझ्याकडे आलो होतो, मात्र आता मला कुठलाच आधार उरला नाही’ असं इम्रान केविलवाण्या स्वरात म्हणाला.

‘मी मुलाशिवाय जगू शकत नाही’

‘तू माझी साथ सोडलीस, आज मी मृत्यूला कवटाळत आहे, आता मला जगायची इच्छा नाही, मी माझ्या मुलाइतके तुझ्यावर प्रेम करत नाही, मी आपल्या मुलासाठी सर्व काही केलं, पण तू आपल्या मुलाला घेऊन गेलीस आणि मला माहित आहे की तू मला त्याची भेट पुन्हा घेऊ देणार नाहीस, तू बरं केलं नाहीस, तुला माहित आहे मी मुलाशिवाय जगू शकत नाही.’ असंही इम्रान म्हणाला होता.

‘पत्नी-सासू माझ्या मृत्यूला जबाबदार’

‘मी व्हिडीओ रेकॉर्ड करुन ठेवत आहे. माझी पत्नी नाझिया आणि माझी सासू माझ्या मृत्यूला जबाबदार आहे, इम्रान त्याची पत्नी नाझिया आणि मुलाशिवाय जगू शकत नाही, हे सासूला समजू शकलं नाही. आज मी गळफास घेऊन आत्महत्या करत आहे.’ असं इम्रान म्हणाला.

संबंधित बातम्या :

सामूहिक बलात्काराने नाशिक हादरले; वणी येथे 42 वर्षांच्या महिलेवर अत्याचार, 4 संशयितांना बेड्या

स्वतःच्याच अपहरणाचा बनाव, विवाहितेने पतीकडून उकळले लाखो रुपये, एका पुराव्यामुळे फुटले बिंग

CCTV VIDEO | नाशकात शालेय मुलांची रस्त्यात हाणामारी, तलावात बुडवून विद्यार्थ्याची हत्या

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI