Nagpur Police : चोरीला गेलेले 10 लाखाचे सोन्याचे दागिने परत मिळाले! नागपूर पोलिसांची कामगिरी; मालकाचा आनंद गगनात मावेना

Nagpur Police : चोरीला गेलेले 10 लाखाचे सोन्याचे दागिने परत मिळाले! नागपूर पोलिसांची कामगिरी; मालकाचा आनंद गगनात मावेना
नागपूर पोलिसांनी 10 लाखाचे दागिने मूळ मालकाला परत मिळवून दिले
Image Credit source: TV9

नागपूरच्या एका कुटुंबातील 10 लाखाचे सोन्या-चांदीचे दागिने चोरी गेले होते. मात्र, नागपुरातील तहसील पोलिसांनी चोरी गेलेले 10 लाखाचे दागिने त्या कुटुंबाला परत मिळवून दिले. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावेना गेला होता.

सुनील ढगे

| Edited By: सागर जोशी

May 18, 2022 | 8:59 PM

नागपूर : आपली एखादी छोटी वस्तू जरी चोरीला (Theft) गेली तरी आपल्याला किती दु:ख होतं. मग एखाद्याचे 10 लाखाचे दागिने चोरीला गेले असतील तर त्याची अवस्था काय झाली असेल? नागपूरच्या एका कुटुंबातील 10 लाखाचे सोन्या-चांदीचे दागिने (Gold Silver Jewelry) चोरी गेले होते. मात्र, नागपुरातील तहसील पोलिसांनी (Nagpur Police) चोरी गेलेले 10 लाखाचे दागिने त्या कुटुंबाला परत मिळवून दिले. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावेना गेला होता.

मार्च महिन्यात तहसील पोलीस स्टेशन हद्दीत एक मोठी घरफोडी झाली होती. त्यात जवळपास 10 लाख रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरी गेले होते. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत आरोपीला अटक केली. तसंच संपूर्ण मुद्देमालही त्याच्याकडून हस्तगत केला. हा मुद्देमाल मूळ मालकाला परत करण्यासाठी न्यायालयाची सर्व प्रक्रिया पार पाडली. त्यानंतर सर्व दागिने त्या मालकाला देण्यात आले. नागपूर पोलिसांच्या या कामगिरीमुळे पोलीस आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यातील अंतर कमी होऊन, पोलिसांप्रती विश्वास वाढीला मदत होणार आहे.

नागपूर पोलिसांनी 10 लाखाचे दागिने मूळ मालकाला परत मिळवून दिले

व्यापाऱ्याकडून खंडणी मागणाऱ्या तिघांना अटक

नागपुरातील दुसऱ्या एका घटनेत कुख्यात गुंड अबूच्या नावाने धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या आणि मारहाण करणाऱ्या तीन आरोपींना सक्करदरा पोलिसांनी अटक केली. यामध्ये एक अल्पवयीन आहे. तक्रार करणाऱ्याचा जुन्या टायरचा व्यवसाय आहे. तो चांगला चालत होता. त्याच्याकडं पैशे येतात हे गुंडांना माहीत झाले. त्यामुळं त्याच्याकडून हप्ता वसुली करण्याचा आरोपींनी बेत आखला. पण, त्यात ते यशस्वी झाले नाही. प्रकरण पोलिसांत पोहचले. पोलिसांनी तिघांना बेड्या घातल्या.

‘तेरा धंदा अच्छा चल रहा, तू हमे हप्ता दे’

फिर्यादी हा जुन्या टायरचा व्यवसाय करतो. त्याचा व्यवसाय चांगला चालत असल्याने त्याची चर्चा होती. त्यामुळे आरोपीनी त्याच्याकडून खंडणी वसूल करण्याचं ठरविलं. मै अबू का भांझा बोल राहा हूँ तेरा धंदा अच्छा चल रहा, तू हमे हप्ता दे असं म्हणत फोन केला. मात्र त्याने नकार दिला असल्याने आरोपीने त्याच्यावर हल्ला केला. त्याला चाकूने जखमी केलं. पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. त्यातील एक अल्पवयीन आरोपी आहे.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें