संतापजनक! नांदेडमध्ये हुंड्याच्या रकमेसाठी विवाहितेला सासरच्यांनी पाजलं विष, 22 वर्षांच्या तरुणीची मृत्यूशी झुंज सुरु

Nanded Dowry News : नांदेडमधील विमानतळ पोलिसांनी या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करुन घेतलाय. मात्र अद्याप कुणालाही अटक करण्यात आल्याची माहिती समोर आलेली नाही.

संतापजनक! नांदेडमध्ये हुंड्याच्या रकमेसाठी विवाहितेला सासरच्यांनी पाजलं विष, 22 वर्षांच्या तरुणीची मृत्यूशी झुंज सुरु
नांदेडमधील धक्कादायक प्रकार...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 20, 2022 | 10:55 AM

नांदेड : देशात हुंडाविरोधी (Dowry Case) कायदा आणला असला, तरिही त्याचा वचक किती आहे, यावर सवाल उपस्थित करणारी घटना समोर आली आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये (Nanded Crime News) घडलेल्या संतापजनक घटनेवरुन हुंडाबळीचा मुद्दा आजही तितकाच गंभीर असल्याचं स्पष्ट झालंय. एका विवाहीत तरुणीला चक्क विष पाजण्यात आल्याची घटना उघडकीस आलीय. नांदेडमधून उघडकीस आलेल्या या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रातच संताप व्यक्त केला जातोय. या संतापजनक घटनेतील पीडित विवाहित तरुणी मृत्यूशी झुंज देतेय. सध्या या तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पोलिसांनी (Nanded Police) गुन्हाही दाखल केला आहे. मात्र अद्याप कुणालाही अटक कऱण्यात आलेली नाही. पीडित तरुणीच्या नातलगांनी या संपूर्ण प्रकरणी तीव्र शब्दांत रोष व्यक्त केलाय. सासरच्या लोकांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

मृत्यूशी झुंज सुरु

नांदेडच्या विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही भयंकर घटना समोर आलीय. 22 वर्षांच्या तरुणीला तिच्या सासरच्या लोकांनीच विष पाडलं. हुंडची रक्कम मिळावी नाही, म्हणून त्यांनी हे धक्कादायक पाऊल उचललं असा गंभीर आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी पीडित तरुणी गंभीर असून तिची प्रकृत्य अत्यंत नाजूक असल्याचं कळतंय. या विवाहीत तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. सध्या या तरुणीची मृत्यूशी झुंज सुरु आहे.

कारवाईची मागणी

नांदेडमधील विमानतळ पोलिसांनी या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करुन घेतलाय. मात्र अद्याप कुणालाही अटक करण्यात आल्याची माहिती समोर आलेली नाही. आपल्या मुलीसोबत घडलेल्या या घटनेनं पीडित मुलीचे नातलग प्रचंड संतापलेत. त्यांनी सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांत तक्रार देत सासरच्या लोकंवर अटकेची कारवाई व्हावी, दोषींना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

तीव्र संताप

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आता सर्वच स्तरातून रोष व्यक्त केला जातोय. देशात याआधीही हु्ंड्यासाठी छळ करुन अनेक विवाहीत स्त्रियांनी आपलं आयुष्य संपवल्याच्या घटना घडलेल्या आहेत. आता तर थेट सासरच्याच लोकांनी विष पाजत तरुणीचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्यानं चिंता व्यक्त केली जातेय. सध्या पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत पुढे नेमकी कुणावर कारवाई केली जाते, हे पाहणं महत्त्वाचंय.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.