AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nanded : धुळ्यापाठोपाठ आज नांदेडमध्ये 25 तलवारी पकडल्या! एवढ्या तलवारी कुठून आणि कशासाठी येतायत?

अमृतसरहून रेल्वेने या तलवारी आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच हा ऑटे गोकुळनगर भागात पडकला असल्याची माहित पोलिसांनी दिली आहे. विक्री करण्याच्या उद्देशाने तलवारी आणल्याचा पोलिसांना संशय आहे.

Nanded : धुळ्यापाठोपाठ आज नांदेडमध्ये 25 तलवारी पकडल्या! एवढ्या तलवारी कुठून आणि कशासाठी येतायत?
धुळ्यापाठोपाठ आज नांदेडमध्ये 25 तलवारी पकडल्या!Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Apr 29, 2022 | 4:09 PM
Share

नांदेड : काल धुळ्यात पोलिसांनी तलवारींचा मोठा (swords) साठा पकडला होता. त्यानंतर आज नांदेडमध्येही पोलिसांनी (Nanded Police) तलवारींचा मोठा साठा पकडला आहे. नांदेड पोलिसांनी ऑटोतून जाणाऱ्या 25 तलवारी पकडल्या असल्याची माहिती समोर आल्याा आहेत. शिवाजीनगर गुन्हे शोध पथकाने या तलवारी पकडल्या आहेत. अमृतसरहून (Amrutsar) रेल्वेने या तलवारी आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच हा ऑटे गोकुळनगर भागात पडकला असल्याची माहित पोलिसांनी दिली आहे. विक्री करण्याच्या उद्देशाने तलवारी आणल्याचा पोलिसांना संशय आहे. काल धुळ्यात पोलिसांनी मोठा तलवारींचा साठा पकडल्यानंतर महाराष्ट्र हादरून गेला होता. मात्र लगेच आज दुसऱ्या दिवशीच नांदेडमध्येही असाच प्रकार समोर आल्याने पुन्हा खळबळ माजली आहे. नांदेड पोलिसांनी या तलवारी कशासाठी आणल्या होत्या याचा शोध सुरू केला आहे.

राज्यात एवढ्या तलवारी कशासाठी?

आतापर्यंत पोलिसांनी केलेल्या कारवाईत आणि टाकलेल्या धाडीत पुणे, धुळे, नांदेड अशा अनेक ठिकाणाहून तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी आता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राज्याच्या राजकारणातला तणाव वाढला असताना एवढ्या मोठ्या संख्येने तलवारी राज्यात का  येत आहेत. कुणाचा मोठी हिंसा भडकवण्याचा प्रयत्न आहे? की गुंडांकडून दहशत माजवण्यासाठी या तलवारी मागवल्या जात आहेत. याचा शोध सध्या पोलीस घेत आहे. मात्र रोज तलवारी पकडल्या जाऊ लागल्याने आता हे थांबवण्याचे आव्हानही पोलिसांसमोर असणार आहे. आतापर्यंत बहुतांश आलेल्या तलवारी या पंजाबमधून आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या तलवारींचे पंजाब कनेक्शनही सापडण्याची शक्यता आहे. पोलीस त्याच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.

अनेकदा रस्त्यावर तलवारी नाचवल्या

राज्यात आणि शहरांमध्ये दहशत पसरवण्याकरता अनेकदा गुंडांकडून रस्त्यावर तलवारी नाचवण्याचे प्रकार समोर आले आहेत. पुण्यातही अनेकदा असे प्रकार समोर आले आहेत. या तलवारी नाचवणाऱ्या गुडांवर वेळोवेळी पोलिसांनी कारवाईही केली आहे.  मात्र तरीही राज्यात बाहेरून येणाऱ्या तलवारी थांबत नाहीत. त्यामुळे हे थांबवायचं कसं असाही पेच आता राज्यातल्या पोलीस यंत्रणेसमोर आहे. अशा तलवारी येत राहिल्या तर सहाजिकच त्यातून राज्यात हिंसाचार वाढणार आहे. त्यामुळे पोलीस यावर तातडीने उपाय शोधण्याकरीता पाऊलं उचलत आहे. आता या तलवारी आणण्यामागचा उद्देश काय हे पोलीस तपासानंतरच स्पष्ट होईल. मात्र सध्या तरी हे प्रकार धडकी भरवणारे आहेत.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.