अनैतिक संबंधांत गुरफटली, नवऱ्याला थेट नदीत फेकलं, प्रियकरासोबत… कॉल रेकॉर्डिंगमुळे खुनाचा कांड समोर!
सध्या एका महिलेने अनैतिक संबंधांसाठी आपल्या पतीला नदीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर आता एकच खळबळ उडाली आहे.

Nanded Crime News : पती-पत्नीचं नातं हे विश्वासावर टिकलेलं असतं. एकमेकांवर विश्वास ठेवून आयुष्याच्या शेवटपर्यंत साथ द्यायची असते. म्हणूनच हे नातं अत्यंत पवित्र मानलं जातं. पण या सर्व धारणांना छेद देणारा नांदेड जिल्ह्यातील एक धक्कादयक आणि क्रूर प्रकार समोर आलेला आहे. अनैतिक संबंधांत अडथळा ठरणाऱ्या पतीला एका महिलीने आपल्या प्रियकराच्या मदतीने संपवले आहे. विशेष म्हणजे नवऱ्याला संपवण्यासाठी तिने त्याला जिंवत असताना नदीत फेकून दिले आहे. कॉल रेकॉर्डींगमुळे खुनाच्या दीड महिन्यांनी हा उलगडा झाला आहे. या घटनेनंतर आता सर्वत्र खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जातोय. आरोपी महिलेचे नाव प्रियांका असे आहे.
नेमकं काय घडलं?
नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तब्बल दीड महिन्यांच्या तपासानंतर पोलिसांनी या रहस्याचा उलगडा केला. अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीला पत्नीने प्रियकराच्या मदतीने दारूच्या नशेत पैनगंगा नदीच्या पुलावरून जिवंत फेकून दिलं होतं. अखेर मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि तपासाच्या आधारे पोलिसांनी पत्नी प्रियंका भगत आणि तिचा प्रियकर शेख रफीक यांना अटक करून या खुनाचा छडा लावला. या अनैतिक प्रेमप्रकरणात मात्र पती किशन भगत याचा बळी गेला आहे.
पोलिसांनी खुनाचा उलगडा कसा केला?
या प्रकरणाबद्दल पोलिसांनी सविस्तर माहिती दिली आहे. मयत किशन भगत यांचा अनैतिक संबंधातून खून झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. यात बायको आणि प्रियकर सहभागी आहेत. 29 ऑगस्ट रोजी मयत किशन भगत गायब असल्याची तक्रार आली होती. किशन भगत यांची बायको प्रियांका भगत यांनीच ही तक्रार दिली होती. दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी आपल्या तपासाला सुरुवात केला होती. यादरम्यान यवतमाळ जिल्ह्यातील महागाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत पैनगंगा नदीत अनोळखी मृतदेह आढळून आला होता. पुढे हा मृतदेह किशन भगत यांचा असल्याचे समोर आले. पोलिसांनी आपला तपास चालूच ठेवला होता. परिणामी या खुनाचे धागेदोरे किशन भगत यांची पत्नी आणि तिच्या प्रियकरापर्यंत पोहोचले. आता या दोघांनाही अटक करण्यात आले असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत.
