Nashik Crime | नाशिकमध्ये अवैध शस्त्रसाठा जप्त; पिस्तुल, काडतुसे, एअरगन, चॉपर, अग्निशस्त्रासह संशयितांना बेड्या

Nashik Crime | नाशिकमध्ये अवैध शस्त्रसाठा जप्त; पिस्तुल, काडतुसे, एअरगन, चॉपर, अग्निशस्त्रासह संशयितांना बेड्या
सांकेतिक फोटो

नाशिकमध्ये शस्त्रांची चोरटी वाहतूक आणि अवैध विक्रीमुळे पोलिसांसमोरील आव्हान वाढले आहे. आता कुणाजवळही शस्त्र सापडत आहे. हे ध्यानात घेता त्यांनाही सावधिगिरीची पावले टाकावी लागतील.

विठ्ठल भाडमुखे

| Edited By: मनोज कुलकर्णी

Jan 27, 2022 | 9:41 AM

नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) गेल्या काही दिवसांपासून प्रचंड प्रमाणात वाढलेल्या गुन्हेगारीचे तणकट आता ग्रामीण भागामध्ये फोफावत असल्याचे समोर येत आहे. खून, दरोडे, चोऱ्या याचा सुळसुळाट सुरूय. अगदी क्षुल्लक गोष्टींसाठी कधी कोण कोणाच्या जिवावर उठेल याचा नेम नाही. त्यामुळेच अवैध शस्त्रांच्या चोरट्या व्यापारालाही खतपाणी मिळत आहे. आता ग्रामीण पोलिसांनी केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात शस्त्रे मिळाली आहेत. हे पाहून पोलिसही (P0lice) चक्रावून गेले असून, त्यांनी तीन संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत.

अशी केली कारवाई

सुरगाणा येथे काही जणांकडे अवैध शस्त्रसाठा असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना त्यांच्या खबऱ्याकडून मिळाली होती. या माहित्याच्या आधारे त्यांनी संबंधितांची विचारपूस केली. तेव्हा त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच ते वठणीवर आले. त्यांच्याकडे देशी बनावटीचे तीन पिस्तुल, तीन जिवंत काडतुसे, एक एअरगण, एक चॉपर, एक कोयता, अग्निशस्त्र अशी एकामागून एक प्राणघातक शस्त्रे सापडली. त्यामुळे पोलिसही चक्रावून गेले. त्यांनी याप्रकरणी अंकेश एखंडे, श्याम पवार, आकाश भगरे या ती संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांची चौकशी सुरू केली आहे.

कशासाठी जमवाजमव?

पोलिसांनी संशयितांची चौकशी सुरू केली आहे. त्यांनी इतक्या मोठ्याप्रमाणात शस्त्रसाठा कशासाठी जमा केला. नेमके त्यांना काय करायचे होते, कुठे घातपाताचा डाव होता का, या शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत. मात्र, शस्त्रांची चोरटी वाहतूक आणि अवैध विक्रीमुळे पोलिसांसमोरील आव्हान वाढले आहे. आता कुणाजवळही शस्त्र सापडत आहे. कोणीही देशी कट्टा, पिस्तुलीच्या सहाय्याने पोलिसांवर गोळीबार करू शकतो. हे ध्यानात घेता त्यांनाही सावधिगिरीची पावले टाकावी लागतील. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे. त्यातून काय समोर येते पाहावे लागेल.

पोलिसांसमोर आव्हान

– सुरगाणा येथे केली कारवाई.

– ग्रामीण पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

– तीन संशयितांकडे मिळाला शस्त्रसाठा.

– अंकेश एखंडे, श्याम पवार, आकाश भगरे.

– या संशयितांकडे मिळाला शस्त्रसाठा.

– 3 पिस्तुल, 3 तीन जिवंत काडतुसे.

– 1 एअरगण, 1 चॉपर, 1 कोयता.

– अग्निशस्त्रही मिळाल्याने खळबळ.

– पोलिसांकडून अधिक तपास सुरू.

इतर बातम्याः

Nashik MHADA | म्हाडा भूखंडात कोट्यवधींचा घोटाळा; मंत्री आव्हाडांचा सलग 2 ट्वीटमधून बॉम्बगोळा!

Nashik | ऑनलाईन शिक्षणाने मारले, 11 वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; 2 महिन्यांतली तिसरी घटना

National Children’s Award | 14 किलोमीटर खाडी 4 तास 9 मिनिटांत पोहून पार; ‘स्वयंम’च्या यशाने पंतप्रधानही भारावले…!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें