Nashik | तरुणास आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सावकाराला नाशिकमध्ये बेड्या

नीलेश बाळासाहेब सोनवणे असे मृताचे नाव असून, निखिल भावले असे अटक केलेल्या सावकाराचे नाव आहे.

Nashik | तरुणास आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सावकाराला नाशिकमध्ये बेड्या
लग्नाचे रिसेप्शन, वऱ्हाड्यांचा डीजेवर ताल, अचानक तरुण कोसळला
Follow us
| Updated on: Jan 20, 2022 | 9:23 AM

नाशिकः नाशिकमध्ये उसणे पैसे वसुलीसाठी सावकाराने (moneylender) वारंवार छळ केल्यामुळे तरुणाने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. अखेर या प्रकरणी संबंधित सावकाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नीलेश बाळासाहेब सोनवणे असे मृताचे नाव असून, निखिल भावले असे अटक केलेल्या सावकाराचे नाव आहे. याप्रकरणी नीलेशची आई आणि भावाने सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

10 हजारांसाठी छळ

सातपूर येथील अशोकनगर भागात नीलेश सोनवणे रहायचा. नीलेशला आर्थिक चणचण होती. त्यामुळे खासगी सावकार निखिल भावले याच्याकडून 10 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जाच्या व्याजाच्या वसुलीसाठी भावलेने गेल्या कित्येक दिवसांपासून नीलेशमागे तगादा लावला होता. तो त्याच्याकडे सतत पैशाची मागणी करायचा. शिवाय अपशब्द उच्चारायचा. यामुळे नीलेश टेन्शनमध्ये होता. मात्र, काही दिवसांपूर्वी सावकार भावले याने नीलेशची दुचाकी ओढून नेली. त्यामुळे नीलेश नैराश्याच्या गर्तेत गेला. त्यामुळे त्याने गळफास घेत आत्महत्या केली. अशी तक्रार नीलेश आई आणि भावाने सातपूर पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी सावकार निखिल भावलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर या सावकाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

कायदा धाब्यावर

बेकायदेशीर सावकारांना पायबंध घालण्यासाठी शासनाने महाराष्ट्र सावकारी (नियमन) अध्यादेश 2014 हा सुधारित कायदा संपूर्ण राज्यभर लागू केला आहे. या नव्या कायद्याच्या तरतुदीनुसार विनापरवाना व अवैध सावकारी केल्यास संबंधितांस 5 वर्षापर्यंत कैदेची शिक्षा किंवा 50 हजार रुपयांपर्यंत दंड यापैकी एक किंवा दोनही प्रकारच्या शिक्षेची तरतूद आहे. तसेच परवाना प्राप्त करुन घेताना हेतूपुरस्पर व जाणीवपूर्वक दिशाभूल करणारी माहिती अर्जासोबत सादर केल्यास 2 वर्षापर्यंत कैदेची शिक्षा किंवा 25 हजार पर्यंत दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. खोट्या नावाने परवाना घेणे, नमूद पत्त्याव्यतिरीक्त किंवा कार्यक्षेत्राबाहेर सावकारी व्यवसाय करणे, दुसऱ्याच्या नावावर सावकारी करणे या बाबी आढळल्यास पहिल्यांदा गुन्हा केल्यास 1 वर्षापर्यंत कैद किंवा 15 हजार रुपये दंडाची शिक्षा, हाच गुन्हा दुसऱ्यांदा किंवा त्यानंतर केल्यास 5 वर्षापर्यंत कैद किंवा 50 हजारापर्यंत दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. मात्र, या कायद्याच्या कचाट्यातून अनेक सावकार सुटतात. त्यामुळे असे बळी जात आहेत. मात्र, या प्रकरणात तरुणाने आत्महत्या केल्यामुळे या शिक्षेत वाढ होऊ शकते.

इतर बातम्याः

Nashik Water | नाशिकमध्ये आज पाणी नाही, पंपिंग स्टेशनमध्ये दुरुस्ती; कधी सुरळीत होणार पुरवठा?

Nashik | डाव्या चळवळीला धक्का; ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक कॉम्रेड नामदेवराव गोडसे यांचे निधन

Nagar Panchayat Election result 2022 : द्राक्षपंढरी निफाडमध्ये भाजपचा सुपडा साफ; राष्ट्रवादीचे आमदार बनकरांनाही धक्का

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.