AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाचव्या मजल्यावरुन लिफ्टच्या खड्ड्यात पडला, नाशकात 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

नाशिकच्या मुंबई नाका येथील नामांकित मानवता कॅन्सर हॉस्पिटलमध्ये ठेकेदारामार्फत दिलेल्या कामानुसार लिफ्टच्या दारावर पोस्टर चिकटवताना अश्फाक शब्बीर नगीनेवाले हा 25 वर्षीय तरुण लिफ्टच्या खड्ड्यात खाली पडला होता.

पाचव्या मजल्यावरुन लिफ्टच्या खड्ड्यात पडला, नाशकात 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
नाशिकमध्ये लिफ्टच्या खड्ड्यात पडून तरुण मृत्युमुखीImage Credit source: टीव्ही9
| Edited By: | Updated on: Mar 04, 2022 | 8:33 AM
Share

नाशिक : लिफ्टच्या खड्ड्यात पडून तरुणाचा मृत्यू (Lift Accident) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकमधील (Nashik) मानवता कॅन्सर रुग्णालयात (Cancer Hospital) हा प्रकार घडला. या घटनेची माहिती मिळताच तरुणाच्या नातेवाईकांनी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ठेकेदाराने दिलेल्या कामानुसार लिफ्टच्या दारावर पोस्टर लावताना हा तरुण लिफ्टच्या खड्ड्यात पडला होता. अश्फाक शब्बीर नगीनेवाले असं 25 वर्षीय मयत तरुणाचं नाव आहे.

काय आहे प्रकरण?

नाशिकच्या मुंबई नाका येथील नामांकित मानवता कॅन्सर हॉस्पिटलमध्ये ठेकेदारामार्फत दिलेल्या कामानुसार लिफ्टच्या दारावर पोस्टर चिकटवताना अश्फाक शब्बीर नगीनेवाले हा 25 वर्षीय तरुण लिफ्टच्या खड्ड्यात खाली पडला होता. जबर मार लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. याबाबत मुंबई नाका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मुंबई नाका पोलिस अधिक तपास करत आहे.

तरुणाच्या कुटुंबाला मदतीचं आश्वासन

या घटनेची माहिती मिळताच मयत तरुणाच्या नातेवाईकांनी या घटनेला हॉस्पिटल प्रशासन जबाबदार असून जोपर्यंत हॉस्पिटल विरोधात गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली होती, मात्र पोलिस प्रशासनाकडून या घटनेबाबत कारवाईची आणि हॉस्पिटल प्रशासनाकडून आर्थिक मदत, तसेच तरुणाच्या बायकोला नोकरी देण्याचं आश्वासन देण्यात आले आहे.

दुर्घटनेवरुन अनेक सवाल

एकूणच या घटनेनंतर एकच प्रश्न उपस्थित होतो की, हॉस्पिटलच्या पाचव्या मजल्यावरच्या लिफ्टच्या दरवाजाला स्टिकर चिकटवण्यासाठी अश्फाक गेला, तेव्हा लिफ्ट चौथ्या मजल्यावर असणं अपेक्षित होतं, मात्र लिफ्ट पहिल्या मजल्यावर होती, त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली आहे. पोलिसांनी योग्य तपास करून दोषींवर कारवाई करावी, अशीच मागणी आता मयत तरुणाचे नातेवाईक करत आहेत.

संबंधित बातम्या :

पाटाच्या पाण्यात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला; मंत्री दानवेंचा नातेवाईक असल्याची चर्चा

ट्रकच्या टक्करने पिकअप व्हॅनचा चुराडा; नाशिकचे 3 तरुण गतप्राण, दोघे गंभीर 

प्रेयसीच्या घरी प्रियकराची आत्महत्या; बसमध्ये ओळख, पण शेवट नाशिकमधल्या रस्त्यावर बेवारस

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.