AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Igatpuri Murder : अंगावर पेट्रोल टाकून तरुणाची हत्या! आरोपीला जन्मठेपेसह 35 हजार रुपये दंडाची शिक्षा

सुरेश प्रभूदयाल गुप्ता ऊर्फ बबलीशेठ आणि बोरसे बंधू गल्लीत गप्पा मारत होते. याचवेळी संशयित आरोपी कुणाल हरकरे याने दुपारच्या भांडणाचा राग मनात धरून लखन बोरसेवर पेट्रोल टाकले. आगीचा पेटता बोळा लखन बोरसेच्या अंगावर फेकला.

Igatpuri Murder : अंगावर पेट्रोल टाकून तरुणाची हत्या! आरोपीला जन्मठेपेसह 35 हजार रुपये दंडाची शिक्षा
इगतपुरी पोलीस स्थानकImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Sep 03, 2022 | 12:52 PM
Share

इगतपुरी : 2018 झाली हत्याप्रकरणी नाशिका जिल्हा सत्र न्यायालयने (Nashik District Session Court) अखेर निकाल दिलाय. या हत्याप्रकरणातील (Igatpuri Murder) आरोपीला 35 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सोबत जन्मठेपेचीही शिक्षा मुख्य आरोपीला न्यायमूर्तींना ठोठावली. या हत्याप्रकरणातील आरोपीचं वय अवघं 28 वर्ष आहे. शुक्रवारी या हत्याप्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात आला होता. इगतपुरीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे (Rajesh Shingte) यांनी ह्या प्रकरणाचा सर्वांगीण तपास केला होता. त्यानंतर सबळ पुरावे जमा केल्याचे न्यायालयाने ग्राह्य धरले. सहायक सरकारी अभियोक्ता म्हणून ॲड. योगेश कापसे यांनी काम पाहिले. कुणाल किशोर हरकरे वय 28, रा. भजनी मठाजवळ, इगतपुरी असे जन्मठेप आणि आर्थिक दंडाची शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

काय होतं 2018 सालचं ते थरारक हत्याकांड?

तो दिवस होता 23 सप्टेंबर 2018. याच दिवशी इगतपुरीच्या कोकणी मोहल्ला येथे दीपक खंडू बोरसे, प्रशांत ऊर्फ लखन खंडू बोरसे हे गणपती विसर्जनाच्या तयारीसाठी काम करीत होते. यावेळी कुणाल किशोर हरकरे याने खुनशीने पाहत असल्याचा राग धरला. दीपक बोरसे, प्रशांत बोरसे या भावांसोबत त्याने वाद घातला. ह्या भागातील नागरिकांनी यावेळी हा वाद मिटवला. त्यानंतर गणपती विसर्जन पार पडले.

कारण छोटं, राग मोठा!

रात्रीच्या वेळी सुरेश प्रभूदयाल गुप्ता ऊर्फ बबलीशेठ आणि बोरसे बंधू गल्लीत गप्पा मारत होते. याचवेळी संशयित आरोपी कुणाल हरकरे याने दुपारच्या भांडणाचा राग मनात धरून लखन बोरसेवर पेट्रोल टाकले. आगीचा पेटता बोळा लखन बोरसेच्या अंगावर फेकला. दीपक व बबलीशेठ यांच्याही अंगावर पेट्रोल उडाल्याने तसेच लखनची आग विझविताना दोघेही भाजले.

मृत्यूशी झुंज अपयशी

भाजल्यामुळे गंभीर जखमी असलेल्या प्रशांत बोरसेवर मुंबईत उपचार सुरू असताना तिसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू झाला. इगतपुरी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे यांनी तपासाची चक्रे फिरवली. कुणाल हरकरेच्या विरोधात सबळ पुरावे जमा केले. जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

यानंतर नाशिकचे जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आर. आर. राठी यांच्यासमोर खटल्याची सुनावणी झाली. फिर्यादी, साक्षीदार व पंच यांनी दिलेली साक्ष आणि तपासी अंमलदारांनी सादर केलेले परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरण्यात आले. त्यानंतर मुख्य आरोपी कुणाल हरकरे याला जन्मठेप आणि 35 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.