AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हायप्रोफाईल रेव्ह पार्टीचा पर्दाफाश, दिग्गज अभिनेत्रींसह बॉलिवूड कोरिओग्राफर पोलिसांच्या ताब्यात

विशेष म्हणजे पार्टीत ड्रग्ज, गांजा आणि हुक्याचा वापर करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी मराठी बिग बॉसमधील एका अभिनेत्रीसह 22 जण ताब्यात घेतले आहेत (Nashik Police raid on Igatpuri Resort Rave Party Bigg Boss Fame Actress found with 22 others).

हायप्रोफाईल रेव्ह पार्टीचा पर्दाफाश, दिग्गज अभिनेत्रींसह बॉलिवूड कोरिओग्राफर पोलिसांच्या ताब्यात
हायप्रोफाईल रेव्ह पार्टीचा पर्दाफाश, दिग्गज अभिनेत्रींसह बॉलिवूड कोरिओग्राफर पोलिसांच्या ताब्यात
| Edited By: | Updated on: Jun 27, 2021 | 9:19 PM
Share

नाशिक : वाढदिवस होता म्हणून मित्रांना घेऊन इगतपुरी गाठली. वाढदिवसाची पार्टी कायम लक्षात राहावी म्हणून धुमधडाक्यात साजरी केली. केक कापल्यानंतर पार्टीत सारेचजण ड्रग्ज, गांजा, हुक्क्याच्या नशेत तल्लीन झाले. विशेष म्हणजे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही पार्टीत होत्या. पण पोलिसांची धाड पडली आणि पार्टी उधळून लावली. संबंधित घटना ही इगतपुरीत घडली आहे. इगतपुरीत हायप्रोफाईल रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला. विशेष म्हणजे पार्टीत ड्रग्ज, गांजा आणि हुक्याचा वापर करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी मराठी बिग बॉसमधील एका अभिनेत्रीसह 22 जण ताब्यात घेतले आहेत (Nashik Police raid on Igatpuri Resort Rave Party Bigg Boss Fame Actress found with 22 others).

नेमकं प्रकरण काय?

मुंबईपासून जवळच असलेल्या इगतपुरीतील स्काय ताज व्हिला या बंगल्यात हाय प्रोफाईल पार्टी सुरु होती. नशेत नाचगाणी, हुक्का आणि ड्रग्जचं सेवन सुरु होतं. बेधुंद होऊन पार्टीत सर्वजण गुंग झाले होते. या पार्टीची चाहूल पोलिसांना लागली. पोलिसांना गोपनीय माहितीच्या आधारे इगतपुरीतील बंगल्यात रेव्ह पार्टी सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे नाशिक ग्रामीण पोलिसांची टीम त्या बंगल्यावर दाखल झाले. यावेळी त्यांनी जे बघितलं त्याने त्यांना धक्काच बसला. पार्टीतील सर्वजण ड्रग्ज, गांजा, दारुच्या नशेत आढळले. पोलिसांनी छापेमारी करत पार्टीत असलेले 10 पुरुष आणि 12 महिला असे एकूण 22 जणांना ताब्यात घेतलं. तर काहीजण पळण्यात यशस्वी झाले. तसेच पोलिसांनी स्काय व्हिला येथील स्टाफला देखील ताब्यात घेतलं आहे.

पार्टीत चित्रपटसृष्टीतील महिला

या पार्टीत चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या महिलाही सहभागी झाल्या होत्या. यात मराठी बिग बॉसमध्ये सहभागी झालेल्या एका अभिनेत्रीचाही समावेश आहे. एक महिला साऊथ इंडियन अभिनेत्री आहे. तर दोन महिला बॉलिवूडच्या कोरिओग्राफर आहेत. तसेच एका इटालियन महिलेचाही पार्टीत समावेश होता. एका मित्राच्या पार्टीसाठी सगळेजण आले होते. पण सगळेच ड्रग्जच्या नशेत आढळून आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

मुंबईतून एकाला अटक

या छाप्यात मिळालेले अंमली पदार्थ नेमके कुठून आणले याबाबतची माहिती घेऊन एक तपास पथक तात्काळ मुंबईला रवाना झालं. मुंबईत या पथकाने एका नायजेरियन नागरिकाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास नाशिक ग्रामीण पोलीस करत आहेत (Nashik Police raid on Igatpuri Resort Rave Party Bigg Boss Fame Actress found with 22 others).

संबंधित बातमी :

इगतपुरीतील रिसॉर्टमध्ये पोलिसांचा छापा, ‘बिग बॉस’ फेम महिलेसह 22 जणांची रेव्ह पार्टी

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.