AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकमध्ये दारूचे व्यसन सोडविण्यासाठी गेलेले सख्खे भाऊ अपघातात ठार

दारूचे व्यसन सोडविण्यासाठी गेलेले सख्खे तरुण भाऊ (Two brothers) अपघातात (accident) ठार झाल्याची घटना नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या मुंबई-आग्रा महामार्गावरील गरवारे पॉइंटजवळ घडली आहे.

नाशिकमध्ये दारूचे व्यसन सोडविण्यासाठी गेलेले सख्खे भाऊ अपघातात ठार
अंबरनाथमध्ये भरधाव बसची दुचाकीस्वाराला धडक
| Edited By: | Updated on: Sep 18, 2021 | 2:44 PM
Share

नाशिकः दारूचे व्यसन सोडविण्यासाठी गेलेले सख्खे तरुण भाऊ (Two brothers) अपघातात (accident) ठार झाल्याची घटना नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या मुंबई-आग्रा महामार्गावरील गरवारे पॉइंटजवळ घडली आहे. गोरख लक्ष्मण जाधव (वय 35) सोमनाथ लक्ष्मण जाधव भाऊ (वय 25) अशी मृतांची नावे आहेत. (Two brothers killed in an accident, Incidents in Nashik district)

इगतपुरी तालुक्यातील मुरंबीत गोरख जाधव रहायचे. त्यांचा लहान भाऊ सोमनाथला दारूचे व्यसन होते. त्यामुळे गोरख हे सोमनाथ यांना दारूचे व्यसन सोडविण्यासाठी वणी येथे दुचाकीवरून घेऊन गेले होते. वणी येथे औषधोपचार करून ते गावाकडे निघाले. तेव्हा परतीच्या प्रवासात मुंबई-आग्रा महामार्गावरील गरवारे पॉइंटजवळील उड्डाण पुलावर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने उडविले. या घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नीसह दोघांनाही दोन मुली, बहीण असा परिवार आहे. या प्रकरणी अबंड पोलिस ठाण्यात गुन्हा वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करणम्यात आला आहे.

रानवड शिवारात चारचाकीने उडवले

नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, रात्री आठच्या सुमारास रानवडहून पिंपळगावकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने एका मोटारसायकलला (एम.एच. 15 जी. एन. 1118) पाठीमागून धडक दिली. त्यात मोटारसायकलवरील आकाश सोमनाथ गिते (वय 24, रा. पालखेड) यांचा जागीच मृत्यू झाला. आकाश यांचे डोके, तोंड, दोन्ही हात व उजव्या पायास गंभीर जखमा झाल्या होत्या. अपघातानंतर वाहनचालकाने वाहन घेऊन पोबारा केला.

पिकअपने दिली धडक

पिंपळगावहून रानवडे जाणाऱ्या पिकअप गाडीच्या (एम. एच. 15 बी. 2659) चालकाने समोरून येणाऱ्या मोटारसायकलला (एम. एच. 15 एफ. ए. 9773) जोरदार धडक दिली. यात घटनेत मोटारसायकलवरील संदीप शिवराम रसाळ (वय 32, रा. आहेरगाव) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रकने चिरडले

चांदवडहून धुळ्याला जाणाऱ्या दुचाकीवरील दोघांचा मालेगाव – धुळे रस्त्यावर मध्यरात्री एक वाजता अपघाती मृत्यू झाला. मालेगाव धुळे रस्त्यावरील हॉटेल ग्रीन प्लाझा समोर काही दिवसांपूर्वी हा अपघात घडला. दुचाकीस्वाराने चालत्या ट्रकला मागून जोराची धडक दिली. त्यात गंभीर मार लागल्याने दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. (Two brothers killed in an accident, Incidents in Nashik district)

इतर बातम्याः

अमेरिकेतील पतीकडून पत्नीवर हुंड्यासाठी अमानवीय अत्याचार; मित्रांना पाठवले अश्लील मेसेज, नाशिकमध्ये गुन्हा दाखल

नाशिकः पोलिस कर्मचाऱ्याच्या अंत्ययात्रेत सहभागी होत पोलिस आयुक्तांनी दिला खांदा

मोठी बातमीः देशातील सर्वात रूंद बोगदे ऐतिहासिक वेळेत पूर्ण; कसारा घाट फक्त 5 मिनिटांत पार, मुंबई आणखी जवळ

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.