लॉजवर बोलवून प्रेयसीची गळा दाबून हत्या, नाशिकमध्ये प्रियकराला बेड्या

प्रेयसी अन्य तरुणाच्या संपर्कात असल्याच्या संशयातून प्रियकर तन्मय धानवाने तिची हत्या केली (Nashik Lodge Boyfriend Murder lady)

  • विठ्ठल भाडमुखे, टीव्ही 9 मराठी, नाशिक
  • Published On - 15:42 PM, 15 Jan 2021
लॉजवर बोलवून प्रेयसीची गळा दाबून हत्या, नाशिकमध्ये प्रियकराला बेड्या

नाशिक : नाशिकमधील लॉजवर सापडलेल्या तरुणीच्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे. प्रेयसीचे अन्य तरुणाशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून आरोपीने हत्या केल्याचं समोर आलं आहे. आरोपी प्रियकर तन्मय धानवाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. (Nashik Lady found dead in Lodge Boyfriend arrested for Murder)

प्रेयसी अन्य तरुणाच्या संपर्कात असल्याच्या प्रियकर तन्मय धानवाला संशय होता. या संशयातूनच त्याने आपल्या प्रेयसीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात समोर आली आहे.

दोन दिवसांपूर्वी नाशिकच्या सीबीएस चौकातील सिटी पॅलेस हॉटेलमध्ये ही घटना घडली होती. संबंधित तरुणीचा हॉटेलमधील रुममध्ये संशयास्पद मृत्यू झाल्याचं आढळून आलं होतं. त्यानंतर ही  हत्या आहे की आत्महत्या, असा प्रश्न उपस्थित झाला होता. पोलिसांनी अधिक तपास करुन प्रियकराला ताब्यात घेतलं होतं.

नाशिकमधील वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये बीएससीच्या शेवटच्या वर्षाला शिक्षण घेणारी तरुणी आपल्या प्रियकरासोबत लॉजवर आली होती. यावेळी दोघांमध्ये वाद झाला आणि संशय घेत आरोपीने प्रेयसीचा काटा काढला. आरोपी प्रियकर तन्मय धानवाला न्यायालयात हजर केलं असता 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पालघरमध्ये प्रेयसीला भिंतीत गाडलं

प्रेयसीने लग्नाचा तगादा लावल्यामुळे तिची हत्या करुन मृतदेह भिंतीत पुरल्याची धक्कादायक घटना पालघरमधील वाणगाव येथे घडली. 4 महिन्यांपूर्वी संबंधित तरुणी आणि आरोपी घरातून पळून गेले होते. मात्र, या काळात प्रियकराने तरुणीची हत्या करून तिचा मृतदेह वाणगावमध्ये एका फ्लॅटच्या भिंतीत पुरल्याचे समोर आले आहे. प्रियकराने ही हत्या केल्याचे कबूल केले असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. (Nashik Lady found dead in Lodge Boyfriend arrested for Murder)

चार महिन्यांपासून मुलगी जिवंत असल्याचे भासवले

मुलगी चार महिन्यांपासून गायब असल्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांनी तिचा शोध घेणे सुरु केले होते. पण मुलीचा शोध लागत नव्हता. या 4 महिन्यांमध्ये आरोपी प्रियकराने मुलीचे सोशल मीडिया अकाउंट वापरुन तसेच व्हॅट्सअ‌ॅपद्वारे मृत तरुणी जिवंत असल्याचे भासवले. आरोपी मुलीच्या व्हॅट्सअ‌ॅपवरुन मृत तरुणी बोलत असल्याचे भासवत तिच्या कुटुंबीयांशी बोलायचा. मात्र, शंका आल्यानंतर खरी परिस्थिती जाणून घेण्यासाठी मृत मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली

संबंधित बातम्या :

मित्रासोबत लॉजवर गेलेल्या तरुणीचा संशयास्पद मृत्यू, नाशिकमध्ये खळबळ

खुर्चीत बसून शारीरिक संबंधात तरुणाला गळफास, अटकेतील तरुणी प्रेयसी नव्हे, पत्नी?

(Nashik Lady found dead in Lodge Boyfriend arrested for Murder)