ड्रग्ज प्रकरणातील आरोपीची आत्महत्या, खारघरच्या क्वारंटाईन सेंटरमध्येच गळफास

ड्रग्ज बाळगल्याच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेल्या महम्मद सुलेमान याने क्वारंटाईन सेंटरमध्येच गळफास घेतला

ड्रग्ज प्रकरणातील आरोपीची आत्महत्या, खारघरच्या क्वारंटाईन सेंटरमध्येच गळफास
Follow us
| Updated on: Aug 20, 2020 | 12:04 PM

नवी मुंबई : खारघरमध्ये क्वारंटाईन असलेल्या आरोपीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ड्रग्ज बाळगल्याच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेल्या महम्मद सुलेमान याने क्वारंटाईन सेंटरमध्येच गळफास घेतला. गेल्या काही महिन्यातील ही आरोपीच्या आत्महत्येची तिसरी घटना आहे. (Navi Mumbai Kharghar Prisoner commits Suicide in Quarantine Centre)

तळोजा जेलमधील कैद्यांना कोरोनाची बाधा होऊ नये, यासाठी खारघरमधील गोखले हायस्कूलमध्ये विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहेत. या ठिकाणी अनेक कैदी क्वारंटाईन करण्यात आले आहेत. महम्मद सुलेमान गेल्या चार दिवसांपासून इथे क्वारंटाईन होता. दिल्लीतील ‘एनडीपीएस’ ड्रग्ज प्रकरणातही महम्मद सुलेमान याचा सहभाग होता.

दरम्यान, खारघर पोलीस याबाबत अधिक चौकशी करत आहेत. सध्या पोस्टमार्टमसाठी त्याचा मृतदेह जे जे रुग्णालयात नेला असल्याची माहिती आहे. महम्मद सुलेमानच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

तळोजा कारागृहातही तीन महिन्यांपूर्वी आत्महत्या

तळोजा येथील मध्यवर्ती कारागृहात एका कैद्याने आत्महत्या केल्याचा प्रकार तीन महिन्यांपूर्वी उघडकीस आला होता. शौचालयात चादर अडकवून त्या कैद्याने 27 मे रोजी आत्महत्या केली होती.

बालू गड़सिंगे असे आत्महत्या करणाऱ्या आरोपीचे नाव होते. त्याने पहाटेच्या सुमारास आत्महत्या केली होती. गड़सिंगे याच्यावर माजलगाव, शिवाजीनगर अशा काही ठिकाणी चार ते पाच गुन्हे दाखल होते. कलम 302 आणि 354 अंतर्गत 2017 पासून तो शिक्षा भोगत होता.

संबंधित बातम्या :

चादरीने शौचालयात गळफास, तळोजा कारागृहात कैद्याची आत्महत्या

(Navi Mumbai Kharghar Prisoner commits Suicide in Quarantine Centre)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.