लग्नाच्या आमिषाने 10 वर्ष अत्याचार, 94 लाखांचीही लूट, खारघरमध्ये गुन्हा

लग्नाचं आमिष दाखवून एका महिलेवर गेल्या 10 वर्षांपासून तिच्या इच्छेविरुद्ध शारिरीक संबंध ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे.

लग्नाच्या आमिषाने 10 वर्ष अत्याचार, 94 लाखांचीही लूट, खारघरमध्ये गुन्हा

नवी मुंबई : लग्नाचं आमिष दाखवून एका महिलेवर गेल्या 10 वर्षांपासून तिच्या इच्छेविरुद्ध शारिरीक संबंध (Rape Case Filed Against Man) ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. महिलेला तिची फसवणूक होत असल्याचं लक्षात येताच तिने खारघर पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे (Rape Case Filed Against Man).

नेमकं प्रकरण काय?

पीडित महिला ही खारघर परिसरात महिलांना योगा शिकवते. या दरम्यान, तिची ओळख अवनी सिंग (वय 35) या व्यक्तीशी झाली. त्यानंतर या ओळखीचे रुपांतर मैत्रित झाले. अवनी सिंगने पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिला तिच्या पतीपासून घटस्फोट घेण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवले. हे तब्बल 10 वर्ष सुरु होतं. इतकंच नाही तर तिच्याकडून तब्बल 94 लाख 50 हजार रुपयेही घेतले. मात्र, अवनी सिंग हा आपली फसवणूक करत असल्याचं लक्षात येताच पीडितेने खारघर पोलिसांत दाव घेतली.

पीडिनेते गेल्या 10 वर्षांपासुन लग्नाचे अमिष दाखवुन इच्छेविरुद्ध जबरदस्तीने वारंवार बलात्कार केला म्हणून तक्रार अर्ज वरीष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांचेकडे केला. त्या अर्जाची सखोल चौकशी महिला पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांनी केली. त्यात तथ्य आढळून आल्याने खारघर पोलीस स्टेशनला अवनी सिंगविरोधात भांदवी 376(2)(N),406,313,323,504,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्हाचा तपास महिला पोलीस निरीक्षक विमल बिडवे या करत आहेत. तसेच, कोणत्याही महिलेला कोणी ब्लॅकमेल करत असेल, तर तक्रार करावी. त्याचे निरसन करण्यात येईल, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

खारघर पोलीस स्टेशन येथे महिला तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. खारघर परिसरात असे प्रकार होत असेल तर थेट खारघर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार द्यावी, असे आवाहन खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी केले आहे.

Rape Case Filed Against Man

संबंधित बातम्या :

भीक मागणाऱ्या दिव्यांग मुलानं जेवण मागितलं, रागवलेल्या हॉटेल चालकाचं माणुसकीला काळिमा फासणारं कृत्य

भायंदरमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा भंडाफोड, दोन मॉडेलसह चार पीडित मुलींची सुटका

मुंबईत तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, दोघांना 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI