कुख्यात गँगस्टरने केले लेडी डॉनसोबत लग्न, न्यायालयाने दिला लग्नासाठी पॅरोल

कुख्यात गँगस्टर काला जठेड़ी आणि 'रिव्हॉल्व्हर राणी' अनुराधा चौधरी यांचे लग्न झाले आहे. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात हा विवाह पार पडला. या लग्नानिमित्त द्वारका परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.

कुख्यात गँगस्टरने केले लेडी डॉनसोबत लग्न, न्यायालयाने दिला लग्नासाठी पॅरोल
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Mar 12, 2024 | 8:48 PM

नवी दिल्ली | 12 मार्च 2024 : कुख्यात गुंड संदीप उर्फ काला जठेड़ी आणि लेडी डॉन म्हणून ओळखली जाणारी अनुराधा चौधरी हे लग्नबंधनात अडकले आहेत. संदीप सध्या तिहार तुरुंगामध्ये सजा भोगत आहे. पण, लग्नासाठी दिल्ली न्यायालयाने त्याला पॅरोल दिला. या दोघांच्या लग्नावेळी संपूर्ण परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. या लग्नानिमित्त राजधानी दिल्लीतील द्वारका परिसरात सकाळपासून कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. लेडी डॉन अनुराधा ही स्वतः स्कॉर्पिओ गाडी चालवीत लग्नस्थळी पोहोचली.

गँगस्टर काला जठेड़ी हा तिहार तुरुंगातून थेट लग्नाच्या ठिकाणी पोहोचला. मोठ्या पोलीस बंदोबस्तात त्यांना आणण्यात आले. लग्न ठिकाणी आल्यानंतर त्याने भावी पत्नी अनुराधा चौधरी हिच्याशी काही वेळ चर्चा केली. त्यानंतर दोघे थेट लग्नमंडपात गेले. येथे काला जठेड़ी याने लेडी डॉनसोबत विधीनुसार लग्न केले.

लग्नावेळी लेडी डॉन ​​अनुराधा चौधरी हिने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तर, काला जठेड़ी याने कुर्ता-पायजमा आणि डोक्यावर लाल पगडी घातली होती. या लग्नात पोलिसांनी डीजे वाजवू दिला नाही. यावेळी दिल्ली पोलिसांची टीम, तीन बटालियन, विशेष कर्मचारी आणि सुमारे 150-200 पोलिसांची टीम लग्नठिकाणी तैनात करण्यात आली होती.

द्वारका येथील एका बँक्वेट हॉलमध्ये हा विवाह पार पडला. लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांची संपूर्ण यादी पोलिसांनी तपासली होती. काला जठेड़ी याच्या लग्नासाठी पॅरोलची मागणी करताना वकील रोहित दलाल यांनी कायद्यात लग्नाचा अधिकार स्पष्ट करण्यात आला आहे. हे घटनेच्या कलम 21 अंतर्गत येते. याचिकाकर्ता आणि त्याची वाढू दोघेही प्रौढ आहेत असा असा युक्तिवाद केला होता. त्यामुळे न्यायालयाने तीन तासांच्या पॅरोलवर त्याची सुटका केली होती.

अनुराधा चौधरी उर्फ ​​मॅडम मिंज तिच्या लग्नासाठी स्वतः स्कॉर्पिओ गाडी चालवत दिल्लीला पोहोचली. या लग्नात अनुराधाच्या कुटुंबातील काही खास व्यक्ती उपस्थित होते. काला जठेड़ी हा अनेक गंभीर गुन्ह्यांसाठी तुरुंगात सजा भोगत आहे. त्याच्यावर मकोकाही लावण्यात आला आहे. तसेच त्याच्यावर सिंडिकेट चालवल्याचा आरोप आहे.

काला जठेड़ी आणि अनुराधा चौधरी या दोघांनाही दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने जुलै 2021 मध्ये उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथून अटक केली होती. अनुराधा ही काला जठेड़ी टोळीचीच सदस्य आहे. अनुराधा चौधरी हिच्यावर राजस्थान आणि दिल्लीत खंडणी, अपहरण, खून आदी अनेक गुन्हे दाखल आहेत. अनुराधा चौधरी सध्या जामिनावर बाहेर आहे.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.