AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शंभर रुपयांवरुन वाद, माजी कुलगुरु ध्रुवराज नाईकांची राहत्या घरी कुऱ्हाडीने हत्या

वीस वर्षीय आरोपी प्रवीण मद्यधुंद अवस्थेत ध्रुवराज नाईक यांच्या घरात घुसला. त्याने थेट बेडरुमपर्यंत शिरकाव करत नाईकांकडे शंभर रुपयांची मागणी केली. मात्र त्यांनी नकार दिल्याने आरोपीने कुऱ्हाडीचे घाव घातले

शंभर रुपयांवरुन वाद, माजी कुलगुरु ध्रुवराज नाईकांची राहत्या घरी कुऱ्हाडीने हत्या
Dhrubaraj Naik
| Edited By: | Updated on: Jun 28, 2021 | 1:02 PM
Share

भुवनेश्वर : प्रसिद्ध पर्यावरणवादी आणि संबळपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु ध्रुवराज नाईक (Dhrubaraj Naik) यांची राहत्या घरी हत्या करण्यात आली. मद्यधुंद अवस्थेत घरात घुसलेल्या तरुणाने नाईकांकडे शंभर रुपयांची मागणी करत वाद घातला. त्यानंतर 20 वर्षीय आरोपीने कुऱ्हाडीने वार करत 83 वर्षीय ध्रुवराज नाईक यांची निर्घृण हत्या केली. ओदिशातील झारसुगुदा जिल्ह्यात रविवारी सकाळी ही धक्कादायक घटना घडली. आरोपी प्रवीण धरुआ याला पोलिसांनी अटक केली आहे. (Odisha man hacks noted environmentalist Dhrubaraj Naik to death over Rs 100 fight)

नेमकं काय घडलं?

नाईक कुटुंबीयांच्या माहितीनुसार प्रवीण रविवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत त्यांच्या घरात घुसला. त्याने थेट ध्रुवराज यांच्या बेडरुमपर्यंत शिरकाव केला आणि त्यांच्याकडे शंभर रुपयांची मागणी केली. मात्र ध्रुवराज यांनी प्रवीणची मागणी धुडकावून लावत त्याला बाहेर जाण्यास सांगितलं. त्यामुळे चिडलेल्या प्रवीणने त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले.

कोण होते ध्रुवराज नाईक?

ओदिशातील अग्रगण्य पर्यावरण प्रेमींमध्ये ध्रुवराज नाईक यांची गणना केली जाते. 1998 ते 2001 या काळात ध्रुवराज नाईक यांनी ओदिशातील संबळपूर विद्यापीठाचे कुलगुरु म्हणून काम पाहिले आहे. लाखो वृक्षांची लागवड करत ओदिशात हरितपट्टा कायम राखण्यात ध्रुवराज नाईक यांचं मोठं योगदान मानलं जातं. त्यांच्या निधनाने ओदिशातील हरित चळवळीला मोठा धक्का बसल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

जुन्या वादातून टोकाचं पाऊल

आरोपी प्रवीण हा नाईक यांच्याच कुआरमल गावचा रहिवासी असल्याचं झारसुगुदा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विकास चंद्र दास यांनी सांगितलं. ध्रुवराज नाईक यांनी एक तळे भाडेतत्त्वावर तिसऱ्या व्यक्तीला दिले होते. मात्र प्रवीणला ते फुकटात हवे होते. त्यावरुन त्याचा नाईकांशी वाद झाला होता. प्रवीणने याआधी तळ्याच्या वॉचमनवरही हल्ला करुन गोंधळ उडवला होता. त्यामुळे नाईकांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती.

नाईकांनी बांधलेल्या जंगलातच आरोपी लपला

जामिनावर सुटका झाल्यानंतर प्रवीण ध्रुवराज यांच्या घरी गेला. शंभर रुपयांची मागणी करत तो त्यांच्या बेडरुममध्ये घुसला. मात्र वादावादीनंतर त्याने सोबत आणलेल्या कुऱ्हाडीने ध्रुवराज यांच्यावर हल्ला केला. मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला. नाईक यांना कुटुंबीयांनी तातडीने दवाखान्यात नेले, परंतु दाखल करण्याआधीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हल्ल्यानंतर आरोपी प्रवीण हा ध्रुवराज नाईकांनी बांधलेल्या जंगलातच लपून बसला होता. मात्र पोलिसांनी दोन तासातच त्याची धरपकड केली.

संबंधित बातम्या :

दारुच्या वादातून तरुणाची साताऱ्यात हत्या, पुण्यातून दोघा आरोपींना अटक

गणेश नाईकांच्या खंद्या समर्थकावर कोयता हल्ला, हातावर वार झेलल्याने संदीप म्हात्रे बचावले

(Odisha man hacks noted environmentalist Dhrubaraj Naik to death over Rs 100 fight)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.