काकाच्या मनात नको तो संशय निर्माण झाला, मग 23 वर्षीय पुतण्याला थेट…

पालघरमध्ये काका-पुतण्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. केवळ संशयातून काकाने जे ते पाहून परिसरात एकच खळबळ माजली आहे.

काकाच्या मनात नको तो संशय निर्माण झाला, मग 23 वर्षीय पुतण्याला थेट...
संशयातून काकाने पुतण्याचा काटा काढलाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 06, 2023 | 4:41 PM

पालघर : पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून काकानेच आपल्या पुतण्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना पालघरमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी वाणगाव पोलिसांनी आरोपी काकाला अटक केली आहे. दिनेश हरिश्चंद्र तांडेल असे आरोपी काकाचे नाव आहे. अतुल विलास तांडेल असे मयत पुतण्याचे नाव आहे. याप्रकरणी वाणगाव पोलीस ठाण्यात कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. वाणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बावडे नवापाडा येथील हा धक्कादायक प्रकार घडला.

संशयातून काकाने पुतण्याला संपवले

दिनेश तांडेल याला आपला चुलत पुतण्या अतुलचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. याच संशयातून त्याने पुतण्याच्या घरात घुसून हॉलमध्ये झोपलेल्या पुतण्याला कायमचे संपवले. पुतण्याची हत्या केल्यानंतर आरोपी काका फरार झाला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

अवघ्या काही तासात पोलिसांनी आरोपीला जेरबंद

पोलिसांनी गुन्हा नोंद करत आरोपीचा शोध सुरु केला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पालघर पोलीस आयुक्त बाळासाहेब पाटील आणि अप्पर पोलीस आयुक्त पंकज शिरसाठ यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले. त्याप्रमाणे पोलीस पथकाने अवघ्या काही तासात पोलिसांनी आरोपीला सापळा रचून जंगलातून अटक केली आहे. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून, कुटुंबीयांनाही धक्का बसला आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.
तसाच गेम शिंदेंसोबत, नारायण राणेंबद्दल फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट काय?
तसाच गेम शिंदेंसोबत, नारायण राणेंबद्दल फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट काय?.
मुंबईत कुणाचा किती टक्का? मराठी मताचं विभाजन होणार? कोण किंगमेकर ठरणार
मुंबईत कुणाचा किती टक्का? मराठी मताचं विभाजन होणार? कोण किंगमेकर ठरणार.
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट.
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा.
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात 'ठाकरे ब्रदर्स'मध्ये टीकेचा सामना
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात 'ठाकरे ब्रदर्स'मध्ये टीकेचा सामना.
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.