AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vasai Crime : असं का केलंस ? गर्लफ्रेंडला मारल्यावरही तो सतत ओरडत होता, अंगावर काटा..

वसईमध्ये सनकी प्रियकराने त्याच्या प्रेयसीची भरदिवसा, भररस्त्यात निर्घृणपणे हत्या केली. या घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला असून आजूबाजूनचे लोक नुसते बघ्याची भूमिका घेऊनच उभे होते. कोणी त्या तरूणीला वाचवण्याचा किंवा त्या हल्लेखोर तरूणाला रोखण्याचा प्रयत्न केला नाही. हत्येनंतरही तो मारेकरी सतत ओरडत होता आणि तिच्यावर वार करतच राहिला.

Vasai Crime :  असं का केलंस ? गर्लफ्रेंडला मारल्यावरही तो सतत ओरडत होता, अंगावर काटा..
| Updated on: Jun 19, 2024 | 8:01 AM
Share

माणुसकी नावाचा प्रकारच जगात उरलाय की नाही असा प्रश्न पडावा, माणसाचा माणसावरील विश्वासच उडावा अशी एक मन्न सुन्न नव्हे, बधीर करणारी घटना मुंबईजवळील वसई शहरात घडली. पुरोगामी राज्य अशी ख्याती असलेल्या महाराष्ट्रात भरदिवसा, भररस्त्यात, अनेक लोकांसमोर एका मुलीवर वार केले जातात, ती तडफडून जीव सोडते आणि तिचा मारेकरी जोरजोरात ओरडत तिच्यावर वार करत राहतो… धक्कादायक म्हणा किंवा मनाला विषेद वाटेल अशी घटना म्हणा पण एक व्यक्ती सोडली तर कोणीही त्या नराधम मारेकऱ्याला रोखण्याचा प्रयत्न करताना दिसत नाही. रस्त्यावर चालणारे अनेक जण ते पाहत बघ्याची भूमिका घेत उभे होते, कोणी मोबाईलवर याचा व्हिडीओ शूट करत होते तर कोणी सरळ तेथून पळच काढला. प्रेमप्रकरणातून प्रेयसीची हत्या करणाऱ्या त्या मारेकऱ्याने तिची हत्या केलीच. पण ती मृत झाल्यावरही तिच्यासमोर बसून तो मोठमोठ्याने ओरडत होता आणि माझ्यासोबत असं का केलंस ? असं म्हणतं तिलाच जाब विचारत होता. त्यानंतरही त्याने तिच्या डोक्यावर पुन्हापुन्हा निर्दयीपणे वार केलेच.

तमाशा बघत उभे राहिले लोक

हृदयाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ लोक मोबाईलमध्ये शूट करत होते, त्यावर टिपण्णीही करत होते. समोरचं दृश्य पाहून सगळ्यांनाच वाईट वात होतं, भीतीही वाटत होती. आई ग, अरेरे,चुकचुकल्याचे आवजाही या व्हिडीओत ऐकायला आलेत. पण एक माणूस सोडला तर कोणीच त्या मुलीला वाचवायला पुढे धावलं नाही. सगळे नुसते मख्खपणे उभं राहून मृत्यूचं हे तांडव पहात होते. आरोपी युवक रोहितने मृत तरूणी आरती हिच्यावर वार केले आणि तिचा जीव गेला.

तुमने मेरे साथ ऐसा क्यों किया.. मृतदेहाजवळ ओरडत राहिला !

वसई पूर्व चिंचपाडा परिसरातकाल सकाळी घडलेल्या या घटनेने संपूर्ण राज्य नव्हे देशच हादरला आहे. आरोपीने प्रेयसीच्या डोक्यात लोखंडी पाना मारून तिची हत्या केली. तिचा जीव गेल्यावरही आरोपी तिच्या मृतदेहाजवळ उभा राहिला आणि सतत ओरडत होता. तू माझ्यासोबत असं का केलंस, का केलं असं ? असा सवाल विचारत तो तिच्यावर ओरडत राहिला आणि पुन्हापुन्हा तिच्या डोक्यावर वार करत राहिला. मृत्यूचं हे तांडव दाखवणारा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, अनेकांनी त्याचं शूटिंग केलं पण एकानेही तिला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. कोणी मदतीसाठी पुढे आलं असतं तर कदाचित आज त्या तरूणीचा जीव वाचला असता. सध्या वाळीव पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पोलीस घटनेचा पुढील तपास करीत आहेत.

Vasai Crime : असं का केलंस ? गर्लफ्रेंडला मारल्यावरही तो सतत ओरडत होता, अंगावर शहारे आणणारा Video

का केली हत्या ?

अखेर हे निर्घृण हत्याकांड का घडलं, त्या आरोपीने तरूणीची हत्या का केली, यामागचं कारण आता स्पष्ट झालं आहे. पोलिसांनी स्वत: याबाबतची माहिती दिली आहे. मृत तरुणी आणि तिची हत्या करणारा तिचा प्रियकर यांच्यात सातत्याने भांडण सुरु होतं. तरुणीचं दुसऱ्या कुणासोबत प्रेम प्रकरण सुरु आहे, असा संशय आरोपी प्रियकराला होता. त्यातून दोघांमध्ये भांडणं सुरु होती. याच भांडणातून आरोपीने तरुणीची हत्या केली. आरोपीने प्रेयसीचा राग मनात धरुन एक मोठ्या इंडस्ट्रीयल पान्याने मुलीच्या डोक्यात मारुन तिची हत्या केली. या हल्ल्यानंतर मुलगी धाडकन कोसळली आणि काही क्षणांतच तिचा जीव गेला. याप्रकरणी हत्येचा कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्या तरूणीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.

विरोधकांकडून टीकास्त्र

या घटनेनंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी हळहळ व्यक्त केली आहे. “दिवसाढवळ्या एखाद्या तरुणीची अशा पद्धतीने हत्या होते आणि लोक बघत राहतात. दहा-पंधरा लोक आजूबाजूने जात आहेत. पण नुसतेच बघत आहेत. हे सगळं चित्र विदारक आहे, असं त्या म्हणाल्या. तर काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार वर्षा गायकवाड यांनी थेट राज्य सरकारवर टीका केली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाने राज्यात ठिकठिकाणी बोंबाबोंब असल्याने गुन्हेगारी चौका-चौकात डोके वर काढताना दिसत आहे. यात खून होतोय तो माणुसकीचा. वसईत एका माथेफिरूने तरुणीची भर रस्त्यात निर्घृण हत्या केली. ही घटना मनाला चटका लावून जाणारी आहे. चिंतेची बाब म्हणजे ये-जा करणारे लोक फक्त बघ्याच्या भूमिकेत होते, हे अतिशय वेदनादायी आहे, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.