PNB Scam | ‘पीएनबी’ घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीला बेड्या, नवा फोटो पाहिलात?

PNB Scam | 'पीएनबी' घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीला बेड्या, नवा फोटो पाहिलात?
मेहुल चोक्सी

डोमिनिकाच्या गुन्हे अन्वेषण विभागाने हिरे व्यापारी मेहुल चोक्सीची धरपकड केली (PNB Bank Scam Mehul Choksi )

अनिश बेंद्रे

|

May 27, 2021 | 11:57 AM

अँटिग्वा : पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील आरोपी उद्योजक मेहुल चोक्सी (Mehul Choksi) याला अखेर डोमिनिकामध्ये अटक करण्यात आली आहे. डोमिनिकाच्या गुन्हे अन्वेषण विभागाने चोक्सीची धरपकड केली. चोक्सीचा नवीन फोटो समोर आला आहे. मेहुल चोक्सी मध्य अमेरिकेतील अँटिग्वाहून पसार झाला होता. अँटिग्वामधून तो क्युबाला पळून गेल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्याच्याविरुद्ध इंटरपोलनेही रेड कॉर्नर नोटीस बजावली होती. (PNB Bank Scam Fugitive Accuse Mehul Choksi Arrested in Dominica New Photo Launched)

मेहुल चोक्सी अँटिग्वाचा नागरिक

मेहुल चोक्सीचा हा अँटिग्वाचा नागरिक असल्याचा दावा त्याच्या वकिलांनी दावा केला आहे. तो अँटिग्वाचा नागरिक असल्यानं तिथे मिळणारे सर्व हक्क त्याच्याकडे आहेत. अँटिग्वा एक कॅरिबियन देश आहे. ज्या देशात मेहुल चोक्सीला अटक केली गेली, तो अँटिग्वाच्या आसपासच्या भागातच येतो. परंतु मेहुल चोक्सी डोमिनिकाला का गेला हे अद्याप अस्पष्ट आहे.

मेहुल चोक्सीचा नवा फोटो

अँटिग्वा सरकारने पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील आरोपी उद्योजक मेहुल चोक्सी याचा नवीन फोटो नुकताच लाँच केला होता. गेल्या रविवारी तो घरातून कारने बाहेर पडताना दिसला होता. त्यानंतर अँटिग्वा सरकारने मेहुल चोक्सीचे सर्च ऑपरेशन जारी केले. (PNB Bank Scam Mehul Choksi )

मेहुल चोक्सीचा नवा फोटो

पीएनबी घोटाळ्याचा चोक्सीवर आरोप

चोक्सी आणि नीरव मोदी यांच्यावर पंजाब नॅशनल बँकेची (PNB) काही बँक अधिकाऱ्यांशी संगनमत करून 13,500 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. नीरव मोदी सध्या लंडनच्या तुरुंगात आहे. सीबीआय या दोघांविरुद्ध चौकशी करत आहे. अंमलबजावणी संचालनालयाने पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी मेहुल चोक्सीची 14 कोटींपेक्षा जास्त संपत्ती जप्त केली होती. त्याशिवाय त्याचा गुन्हेगारी सहकारी नीरव मोदी याला युनायटेड किंगडम (UK) कोर्टाकडून मोठा धक्का बसला. कोर्टाने मोदीला कोणतीही सवलत देण्यापासून नकार दिला. नीरव मोदीला दोषी ठरवण्यासाठी आवश्यक पुरावे असल्याचंही वेस्टमिन्स्टर कोर्टानं स्पष्ट केले होते. नीरव मोदीनं पुरावे नष्ट करण्याचा आणि साक्षीदारांना धमकावण्याचा कट रचला होता.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या:

PNB बँक घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला डोमिनिकामध्ये अटक

नीरव मोदीच्या भारत प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा; UK न्यायालयाचा मोठा निर्णय

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें