सावधान! भर रस्त्यात तरुणावर गोळीबार करणारे अटकेत, पोलीस तपासात धक्कादायक कारण समोर

सावधान! भर रस्त्यात तरुणावर गोळीबार करणारे अटकेत, पोलीस तपासात धक्कादायक कारण समोर

प्रतीक रवींद्र आहेर (24) या तरुणावर शनिवारी रात्री खारघर इथं गोळीबार करून फरार झालेल्या चारही आरोपींना अटक करण्यात खारघर पोलिसांना यश आले आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Jan 25, 2021 | 12:54 PM

खारघर : पेण इथून नवी मुंबईत फिरण्यासाठी आलेल्या प्रतीक रवींद्र आहेर (24) या तरुणावर शनिवारी रात्री खारघर इथं गोळीबार करून फरार झालेल्या चारही आरोपींना अटक करण्यात खारघर पोलिसांना यश आले आहे. विपीन शैलेंद्र ठाकुर (19), गोपाल ननु सिंह (23), अभिनंदनकुमार गणेश शर्मा (23) आणि मुचन नागेंद्र ठाकुर (19) अशी या आरोपींची नावे असून त्यांनी लुटमारीच्या उद्देशाने प्रतीक आहेर याच्यावर गोळीबार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. (police investigation revealed Pratik Aher was shot dead with the intention of Theft)

सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे, लुटमारी करून मिळालेल्या पैशातून हॉटेल सुरू करण्याची या तरुणांची योजना असल्याचे तपासात आढळून आले आहे. पोलिसांनी या आरोपींकडून रिव्हॉल्वर व जिवंत काडतुस जफ्त केले आहे. या आरोपींच्या गोळीबारात जखमी झालेला प्रतीक आहेर हा तरुण पेण शहरात राहण्यास असून तो शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पेण येथून मेस्ट्रो या मोटारसायकलवरून नवी मुंबईत फिरण्यासाठी आला होता.

यानंतर रात्री 10 वाजण्याच्या सुमारास तो वाशी येथून सायन पनवेल हमार्गे घरी जात असताना, रियान शाळे समोरील रस्त्यावर सिगरेट ओढण्यासाठी गेला होता. याचवेळी त्या ठिकाणी आलेल्या तिघा आरोपींनी प्रतिककडे मोबाईल, पैसे आणि त्याच्या मोटरसायकलच्या चावीची मागणी केली. मात्र, प्रतीकने त्यांना नकार दिल्याने एकाने प्रतीक जवळचा मोबाईल फोन जबरदस्तीने खेचण्याचा प्रयत्न केला. यामुळे प्रतीकने त्यांना विरोध केल्यानंतर त्यातील एका आरोपीने प्रतीक आहेर याच्या डाव्या पायाच्या मांडीवर आपल्याकडील रिवॉल्वरने एक गोळी झाडली होती.

या गोळीबारात प्रतीक जखमी झाल्यानंतर तिघा आरोपींनी त्या ठिकाणावरून पलायन केले होते. या घटनेची माहिती मिळ्यानंतर खारघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी प्रतीक आहेर याला प्रथम खारघरमधील सिटी हॉस्पिटल आणि त्यानंतर कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले. त्यानंतर पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला होता. त्यासाठी पोलिसांनी खारघर परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली.

मात्र, त्यांना त्यातून काहीच माहिती मिळाली नाही. अखेर पोलिसांनी कोपरा गावातील एकमेव कॅमेरा तपासला असता त्यात गोळीबार झाल्याचं निदर्शनास आले. सदर तरुणांबाबत पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता, एक दिवसापुर्वीच तेथील चाळीमध्ये 4 तरुण राहाण्यासाठी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी त्या भागात सापळा लावून त्याठिकाणी आलेल्या दोघा तरुणांना ताब्यात घेतले. त्यानंतर परिमंडळ-1 चे पोलीस उपआयुक्त सुरेश मेंगडे यांनी दोन्ही तरुणांकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी प्रतीकला लुटण्यासाठी त्याच्यावर गोळीबार केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी दोघांना अटक करुन त्यांच्या इतर दोघा साथिदारांना देखील अटक केली. तसेच त्यांनी ज्या रिव्हॉल्वरमधून गोळीबार केला. ते रिव्हॉल्वर व जिवंत काडतूस देखील जफ्त केले. (police investigation revealed Pratik Aher was shot dead with the intention of Theft)

संबंधित बातम्या – 

धक्कादायक! 2 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार, घरातून फिरायला नेलं आणि…

चिमुरड्याचा क्लचला धक्का लागून ट्रॅक्टर थेट विहिरीत कोसळला, तीन वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

शस्त्र घेऊन फिरणाऱ्या 33 जणांना अटक, हॉटेल, लॉजवर धाडी; मुंबई पोलिसांचं ‘ऑल आऊट’ ऑपरेशन

(police investigation revealed Pratik Aher was shot dead with the intention of Theft)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें