चिमुरड्याचा क्लचला धक्का लागून ट्रॅक्टर थेट विहिरीत कोसळला, तीन वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात बनेवाडी येथे ट्रॅक्टरवर बसलेल्या 3 वर्षाच्या एका चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय.

चिमुरड्याचा क्लचला धक्का लागून ट्रॅक्टर थेट विहिरीत कोसळला, तीन वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू
Follow us
| Updated on: Jan 24, 2021 | 3:32 PM

सांगली : सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात बनेवाडी येथे ट्रॅक्टरवर बसलेल्या 3 वर्षाच्या एका चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. ट्रॅक्टरवर बसलेला असताना या मुलाने ट्रॅक्टरचा क्लच दाबल्याने ट्रॅक्टर थेट विहिरीत पडला. तेजस श्रीरंग माळी असं या 3 वर्षांच्या बालकाचं नाव आहे. गुरुनाथ श्रीरंग माळी हा त्याचा 4 वर्षांचा भाऊ ट्रॅक्टरमधून खाली पडल्याने बचावला. ही दुर्घटना शनिवारी रात्री आठच्या सुमारास घडली. कवठेमंकाळ पोलीस ठाण्यात या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद झाली आहे (Death of 3 year child due to pressing Tractor clutch in Sangli).

बनेवाडी येथील माळीवस्ती परिसरात श्रीरंग माळी यांची शेती आहे. शनिवारी (24 जानेवारी) ते शेतीतील कामासाठी ट्रॅक्टर घेऊन गेले होते. गुरुनाथ आणि तेजस ही त्यांची दोन्ही मुलंही सोबत शेतात आली होती.

दिवसभरात शेतातील कामं उरकून श्रीरंग माळी घरी जाण्यासाठी ट्रॅक्टरमध्ये बसले. त्यांची दोन्ही मुलंही ट्रॅक्टरवर बसलेली होती. मात्र, यावेळी शेतीकामासाठी आणलेलं काही साहित्य विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे श्रीरंग माळी विसरलेले साहित्य आणण्यासाठी गेले. नेमक्या याच वेळी ट्रॅक्टरमध्ये बसलेल्या 2 मुलांपैकी एकाचा पाय ट्रॅक्टरच्या क्लचवर पडला. त्यामुळे अगोदरच उताराला उभा असलेला ट्रॅक्टर वेगाने पळाला. तो थेट समोर असलेल्या विहिरीत जाऊन पडला.

यावेळी ट्रॅक्टरवर बसलेला 4 वर्षांचा मुलगा ट्रॅक्टरवरुन पडला, मात्र 3 वर्षांचा चिमुरडा ट्रॅक्टरवरच राहिला. त्यामुळे तो ट्रॅक्टरसह विहिरीत कोसळला. यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ट्रॅक्टरवरुन खाली पडलेला मुलगा जखमी झाला असला तरी त्याचा जीव वाचला आहे. या घटनेनंतर परिसरातून प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे. माळी दाम्पत्याने आपल्या 3 वर्षांच्या निरागस मुलाला गमावल्याने त्यांच्यावर डोंगरच कोसळला आहे.

हेही वाचा :

नंदुरबारमध्ये मजुरांच्या वाहनाला भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू, 5 महिलांचा समावेश

 ‘बिग बॉस’ची क्रू मेंबर पिस्ता धाकडचा दुचाकी खड्ड्यात आदळल्यानं मृत्यू

धक्कादायक! रस्त्यावर लोंबकणाऱ्या विजेच्या तारेमुळे अख्ख्या बसमध्येच करंट पसरला; सहा प्रवाशांचा मृत्यू

व्हिडीओ पाहा :

Death of 3 year child due to pressing Tractor clutch in Sangli

Non Stop LIVE Update
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.