साताऱ्यात 24 वर्षीय तरुणाकडून गांजाची तस्करी, सापळा रचून पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मिळालेल्या माहितीनुसार शहरातील महालक्ष्मी मंदिराजवळ सागर गायकवाड नावाचा 24 वर्षीय वास्तव्यास आहे. तो दुचाकीवरून गांजा घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गुप्त सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शाहूपुरी पोलिसांनी सापळा रचला. तसेच पोलिसांनी या तरुणाला तसेच त्याच्याजवळ असलेल्या गांजाला तब्यात घेण्यासाठी कारवाई केली. सापळा रचून पोलिसांनी युवकाला ताब्यात घेतले. तसेच पोलिसांनी त्याच्याजवळचा 10 किलो गांजा आणि दुचाकी पोलिसांनी जप्त केली.

साताऱ्यात 24 वर्षीय तरुणाकडून गांजाची तस्करी, सापळा रचून पोलिसांनी ठोकल्या बेड्या
साताऱ्यात गांजा पकडण्यात आला
Follow us
| Updated on: Aug 24, 2021 | 10:42 PM

सातारा : शहरालगत असलेल्या गडकर आळी येथे शाहूपुरी पोलिसांनी 10 किलो गांजा जप्त केला आहे. गडकर आळी येथील महालक्ष्मी मंदिराजवळ राहणाऱ्या सागर गायकवाड या 24 वर्षीय युवकाकडून हा गांजा जप्त करण्यात आला आहे. तरुणाकडे गांजा सापडल्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी केली जात आहे. (police seized 10 kg cannabis at Shahupuri in Satara city 24 yearyoung boy arrested)

सापळा रचून पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतलं

मिळालेल्या माहितीनुसार शहरातील महालक्ष्मी मंदिराजवळ सागर गायकवाड नावाचा 24 वर्षीय तरुण वास्तव्यास आहे. तो दुचाकीवरून गांजा घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गुप्त सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शाहूपुरी पोलिसांनी सापळा रचला. तसेच पोलिसांनी या तरुणाला तसेच त्याच्याजवळ असलेल्या गांजा तब्यात घेण्यासाठी कारवाई केली आणि पोलिसांनी युवकाला ताब्यात घेतले. तसेच पोलिसांनी त्याच्याजवळचा 10 किलो गांजा आणि दुचाकीदेखील जप्त केली. सागर गायकवाड या तरुणाकडून दुसरा एक तरुण गांजा विकत घेत होता. या तरुणालाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी वरील माहिती दिलीय.

यावतमाळमध्ये तब्बल 1 क्विंटल गांजा पकडला

दरम्यान, राज्यात गांजा तसेच ड्रग्ज तस्करीचे प्रमाण वाढले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील झोंबाडी (बाळेगाव) येथे 17 ऑगस्ट रोजी मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून गांजा तस्करी करणाऱ्या महिलेसह चार जणांना अटक केली होती. त्यांच्याकडून तब्बल 31 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यत आला होता. यातील एक आरोपी पसार होण्यात यशस्वी झाला होता. ही कारवाई यवतमाळ जिल्ह्यातील 5 वर्षातील सर्वात मोठी कारवाई होती.

महिलेने एकूण 12 पोत्यांत गांजा भरला होता 

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे पोलीस निरक्षक प्रदीप परदेशी व सहाय्यक पोलीस निरक्षक विवेक देशमुख यांनी ही कारवाई केली होती. पोलिसांनी महिलेची कार व घराची झडती घेतली होती. यामध्ये पोलिसांना तब्बल 1 क्विंटल 90 किलो गांजा सापडला होता. महिलेने हा गांजा एकूण 12 पोत्यांत भरण्यात आला होता. पकडण्यात आलेल्या गांजाची एकूण किंमत 22 लाख 50 हजार होती. तर जप्त करण्यात आलेल्या ईनोव्हाची किंमत 9 लाख रूपये होती.

इतर बातम्या :

अनैतिक संबंधामुळे गर्भवती राहिली, नंतर कोवळ्या बाळाला ओढ्यात फेकलं, चिमुकल्याच्या आक्रोषाने पुणेकर गहिवरले

अनैतिक संबंधाच्या शंकेने पोखरलं, सूनेसोबत भाडेकरुचं अख्खं कुटंबच संपवलं, 5 जणांच्या हत्येमुळे खळबळ

‘निकाल तुमच्या बाजूने येईल 3 लाख द्या’, लाच घेणाऱ्या खासगी एजंटला कोल्हापुरात बेड्या

(police seized 10 kg cannabis at Shahupuri in Satara city 24 yearyoung boy arrested)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.