जुगार अड्ड्यावर छापा, 20 लाखांच्या साहित्यासह 13 जण ताब्यात, कुणाच्या आशीर्वादानं सुरु होता अड्डा?

जुगार अड्ड्यावर छापा, 20 लाखांच्या साहित्यासह 13 जण ताब्यात, कुणाच्या आशीर्वादानं सुरु होता अड्डा?
जुगार अड्ड्यानर कारवाई केल्यानंतर ताब्यात घेतलेले संशयित आरोपी

सहाय्यक पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या पथकाला माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये एकूण 13 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सिद्धेश सावंत

Jan 25, 2022 | 11:04 AM

परभणी : परभणी पोलिसांनी (Parbhani Police) एका हायप्रोफाईल अड्ड्यावर छापा टाकलाय. या छापेमारीमध्ये तब्बल 20 लाख (20 Lacs) रुपयांचं साहित्य जप्त करण्यात आलं आहे. सेलूच्या वालूर इथं असलेल्या कुडा शिवारात हा जुगार अड्डा सुरु होता. कुडा शिवारातील संजय मुंडे यांच्या शेतातील आखाड्यावर बंद टीन शेडमध्ये हा जुगार सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापेमारी करत अखेर या जुगार अड्ड्यावर कारवाई केली आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक अविनाश कुमार (Avinash Kumar) यांच्या पथकाला माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये एकूण 13 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांची आता कसून चौकशी सुरु आहे. आतापर्यंत एकूण पाच गाड्या, दोन दुचाकी यांच्यासह मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सोमवारी रात्री ही कारवाई करण्यात आली आहे.

कारवाईत काय काय जप्त?

हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी एकूण 20 लाख 27 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या छाप्यात पोलिसांनी पाच चारचाकी वाहनंही जप्त केली असून दोन बाईकही ताब्यात घेतल्या आहेत. यासोबत पोलिसांनी जुगाराचं साहित्यही हस्तगत केलं आहे.

चौकशी सुरु

सध्या पोलिसांकडून जुगार अड्ड्यावर कारवाई करत एकूण 13 जणांना ताब्यात घेण्यात आलं असून सध्या या सगळ्यांची कसून चौकशी केली जाते आहे. याप्रकरणी नेमका या जुगाराचा अड्डा कुणाच्या आशीर्वादानं सुरु होता, याचा शोध घेतला जातो आहे. या जुगार अड्डाप्रकरणातील सर्व संशयित आरोपींची चौकशी केली जात असून आता या कारवाईतून काय अधिक माहिती समोर येते, हे पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान, या कारवाईमुळे अवैध जुगार अड्डे चालवणाऱ्यांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. येत्या काळात पोलिसांकडून परभणीतील अवैध जुगार अड्ड्यांवर कारवाईची मोहीमच हाती घेतली जाण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या :

अबब! थोडे थोडकी नव्हेतर 3800 किलो तंबाखू जप्त ; पुणे पोलिसांनी इथे केली करवाई

‘आय लव्ह यू पप्पा, काळजी घ्या’ गळफास घेतलेल्या जान्हवीची सुसाईड नोट वाचून वडील हादरले

कार थेट तब्बल 40 फूट खोल कोसळली, गाडीतलं कुणीच वाचलं नाही, सातही जणांचा जागीच मृत्यू!


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें