AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक! घरातल्या 7 जणांनी एकाच वेळी नदीत झोकून दिलं? सामाजिक प्रतिष्ठेची भीती?

सामाजिक प्रतिष्ठेला धक्का लागू नये, यामुळे कुटुंबियांनी स्वतःला नदीत झोकून दिले का, यासंबंधी पोलीस सखोल तपास करत आहेत.

धक्कादायक! घरातल्या 7 जणांनी एकाच वेळी नदीत झोकून दिलं? सामाजिक प्रतिष्ठेची भीती?
Image Credit source: social media
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Jan 25, 2023 | 9:47 AM
Share

अभिजित पोते, यवत,पुणे : पुण्यातल्या दौंड (Daund) तालुक्यात घडलेल्या घटनेने सध्या जिल्ह्यात खळबळ माजली आहे. एकाच घरातल्या एकानंतर एक अशा 7 जणांचे मृतदेह (Dead body) भीमा नदीपात्रातून (Bhima River) बाहेर निघाले. 18 जानेवारी रोजी पहिला मृतदेह वर आला, त्यानंतर कालपर्यंत तब्बल सात जणांचे मृतदेह आढळले. हा अपघात आहे की घातपात याबाबत तपास सुरु होता. पोलीस तपासाअंती एक मोठं कारण समोर आलं आहे. सदर कुटुंबातल्या मोठ्या मुलाच्या प्रेम प्रकरणाच्या वादावरून संपूर्ण कुटुंबानंच हे धक्कादायक पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. तर ही आत्महत्या नसून हत्या असल्याचाही एक अँगल समोर आलाय.

काय आहे नेमकी घटना?

शिरूर-चौफुला रोडवर असलेल्या दौंड तालुक्यातील पारगाव हद्दीत भीमा नदीच्या पात्रात एकाच कुटुंबातल्या ७ जणांचे मृतदेह टप्प्या-टप्प्याने आढळले. यात दोन पुरुष, दोन महिला आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १७ जानेवारीची असावी, असा अंदाज आहे. १८ जानेवारी रोजी सुरुवातीला एका महिलेचा मृतदेह आढळला. त्यानंतर २० जानेवारी रोजी एका पुरुषाचा तर २१ जानेवारीला आणखी एका पुरुषाचा मृतदेह आढळला. २२ जानेवारी रोजी आणखी एका महिलेचा मृतदेह आढळला. तर २४ जानेवारी रोजी तीन लहान मुलांचे मृतदेह आढळल्याने खळबळ माजली.

कुटुंबाची ओळख पटली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर कुटुंब बीड आणि उस्मानाबाद येथील असल्याचं तपासाअंती समोर आलं. कुटुंबातले प्रमुख मोहन पवार हे पत्नी, मुलगी, जावई आणि तीन नातवंडांसोबत नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज गावात राहत होते. अहमदनगर येथे मोलमजुरी करून हे कुटुंब उदरनिर्वाह करत होते. १७ जानेवारी रोजी रात्री ११ वाजेनंतर सर्व कुटुंबीय वाहनाने निघोज गावातून निघाले होते. पारगावच्या हद्दीतील भीमा नदीच्या पात्रात त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज आहे.

सामाजिक प्रतिष्ठेची भीती?

सदर घटनेमागे सामुहिक आत्महत्येचं कारण असल्याचं प्रथम दर्शनी समोर येतंय. कुटुंबातल्या मोठ्या मुलाच्या प्रेम प्रकरणातून सदर घटना घडली असावी, असा अंदाज व्यक्त केला जातोय. सामाजिक प्रतिष्ठेला धक्का लागू नये, यामुळे कुटुंबियांनी स्वतःला नदीत झोकून दिले का, यासंबंधी पोलीस सखोल तपास करत आहेत. तर ही आत्महत्या नसून अंधश्रद्धेपोटी हत्या केली असावी, असाही संशय व्यक्त केला जातोय.

Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती