AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘माझ्या नादी लागाल, तर करीन 302’ म्हणणारी अखेर अटकेत! सोशल मीडियावरची गुंडगिरी भोवली

Pimpri Chinchwad : पोलिसांकडून खूनाच्या प्रकरणातील आरोपींवर 302 हे कलम लावले जाते. या तरुणीने व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियात पोस्ट केला होता.

'माझ्या नादी लागाल, तर करीन 302' म्हणणारी अखेर अटकेत! सोशल मीडियावरची गुंडगिरी भोवली
संग्रहित फोटो
| Edited By: | Updated on: Jan 30, 2022 | 11:15 PM
Share

पिंपरी : पिंपरी- शहरात अल्पवयीन गुन्हेगारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून अनेकदा शस्त्रांसोबत फोटो व्हिडीओ शेअर करता धमकी देण्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. आता या अल्पवयीन गुन्हेगारांमध्ये मुलीही मागे नसल्याचे दिसून आलं होतं. अखेर पोलिसांनी याचप्रकरणातील अल्पवयीन तरुणींना अटक (Minor girl arrested) केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये असाच एका अल्पवयीन तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात एक सतरा वर्षांची मुलगी प्रत्येक व्हिडीओत शिवीगाळ करताना दिसली होती. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या या तरुणीला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तिच्यावर कारवाई करण्यात आली आहे. वाड पोलिसांनी याप्रकरणी कारवाई केली असून आता या मुलींची पोलिसांकडून चौकशी केली जाते आहे.

काय होतं व्हिडीओमध्ये?

अल्पवयीन मुलीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ती अगदी सराईत गुंडाप्रमाणे गुंडगिरीची भाषा बोलताना दिसून आली होती. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून अल्पवयीन तरुणीनं आपल्या गुंडगिरीचे व्हिडीओ अपलोड केले होते. या व्हिडिओत अल्पवयीन तरुणींनी धक्कादायक वक्तव्य केली होती. ‘कुठला डॉन? आणि कुठला कोण? माझ्या नादी लागाल तर करील 302’ असं या मुलीनं म्हटलं होतं.

चौकशी सुरु

पोलिसांकडून खूनाच्या प्रकरणातील आरोपींवर 302 हे कलम लावले जाते. या तरुणीने व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियात पोस्ट केला होता. एवढ्यावरच न थांबता तरुणीने शब्दाने शब्द वाढत असल्याने शिव्या न देता हाणामारी करून भांडणे सोडवायची असाही सल्ला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दिला होता. या प्रकारच्या व्हिडीओमुळे शहरातील गुन्हेगारी कोणत्या स्तरापर्यंत जाऊन पोहचलीये, असाही गंभीर प्रश्न अधोरेखित झालाय. इतकंच काय तर पालकांचीही चिंता सोशल मीडियाचा गैरवापर करणाऱ्यांनी वाढवली आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या अल्पवयीनं तरुणीच्या चौकशीतून नेमकं काय समोर येतं, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

संबंधित बातम्या :

पिंपरी चिंचवडमधील तरुणाला मारहाण प्रकरण; पोलिसांनी भररस्त्यात काढली आरोपींची धिंड

पेण पोलिसांच्या ताब्यातून हाफ मर्डरचा आरोपी पसार, पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह

हैवानतेचा कळस! नराधम बापासह भावाचाही बलात्कार! आईची डोळेझाक, कल्याणमधील हादरवणारी घटना

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.