Pimpri Chinchwad crime| कुठला डॉन? आणि कुठला कोण? माझ्या नादी लागाल तर करील302 म्हणत अल्पवयीन तरुणीची सोशल मीडियावर गुंडगिरी

Pimpri Chinchwad crime| कुठला डॉन? आणि कुठला कोण? माझ्या नादी लागाल तर करील302 म्हणत अल्पवयीन तरुणीची सोशल मीडियावर गुंडगिरी
तामिळनाडूत सहा महिन्यांच्या गर्भवती शाळकरी मुलीचा मृत्यू

अल्पवयीन मुलीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ती अगदी सराईत गुंडाप्रमाणे गुंडगिरीची भाषा बोलताना दिसून येत आहे. आपल्या सोशल मीडियात अकाऊंटवरून तिने आपल्या गुंडगिरीचे व्हिडीओ अपलोड केले आहेत. या व्हिडिओत अल्पवयीन तरुणी म्हणते कुठला डॉन? आणि कुठला कोण? माझ्या नादी लागाल तर करील 302 असे थेट म्हणताना दिसत आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्राजक्ता ढेकळे

Jan 17, 2022 | 6:05 PM

पिंपरी- शहरात अल्पवयीन गुन्हेगारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा शस्त्रांसोबत फोटो व्हिडीओ शेअर करता धमकी देण्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. आता या अल्पवयीन गुन्हेगारांमध्ये मुलीही मागे नसल्याचे दिसून झाले आहे. मुलीही सोशल मीडियात गुंडागिरी करू लागल्याचे समोर आले आहे. पिंपरी चिंचवडमध्ये असाच एका तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

काय आहे या व्हिडीओमध्ये

अल्पवयीन मुलीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ती अगदी सराईत गुंडाप्रमाणे गुंडगिरीची भाषा बोलताना दिसून येत आहे. आपल्या सोशल मीडियात अकाऊंटवरून तिने आपल्या गुंडगिरीचे व्हिडीओ अपलोड केले आहेत. या व्हिडिओत अल्पवयीन तरुणी म्हणते कुठला डॉन? आणि कुठला कोण? माझ्या नादी लागाल तर करील 302 असे थेट म्हणताना दिसत आहे. पोलिसांकडून खूनाच्या प्रकरणातील आरोपींवर 302 हे कलम लावले जाते. या तरुणीने यावर व्हिडीओ बनवला आहे. एवढ्यावरच न थांबता तरुणीने शब्दाने शब्द वाढत असल्याने शिव्या न देता हाणामारी करून भांडणे सोडवायची असाही सल्ला आपलया व्हिडिओच्या माध्यमातून दिला आहे. या प्रकारच्या व्हिडीओमुळे शहरातील गुन्हेगारी कोणत्या स्तरापर्यंत जाऊन पोहचली आहे,असा प्रश्न निर्माण होताना दिसतो.

गुन्हेगारीला आळा कधी?  पिंपरी चिंचवडमध्ये अशा प्रकारे वाढत असलेल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन सातत्याने प्रयत्न करत आहे. पोलिसांनी सोशल मीडियावरून भाईगिरी करणाऱ्याना चोप देत त्याची झोप उडवल्याचेही अनेक किस्से आहेत. मात्र तरी वाढती गुन्हेगार आद्यपही थांबवण्याचे नाव घेत नसल्याचे समोर आलं आहे.

नाराज “गुलाबी गँग”च्या नेत्यानी काँग्रेस सोडली; या पक्षात प्रवेशाची शक्यता ?

महिला काँग्रेस अध्यक्षाचा थेट भाजपमध्ये प्रवेश; नेमंक कारण काय?

डंपिंगचा वाद पेटला, भंडार्लीत डंपिंग ग्राऊंड उभारण्यास 14 गाव संघर्ष समितीचा विरोध; रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें