Pune Crime : भोर उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी अमित सरदेसाईंवर गुन्हा दाखल

या सोनोग्राफी सेंटर बाबतचा अवहाल वैद्यकीय अधीक्षकांना पाठवायचा असतो. मात्र तक्रारदाराच्या सोनोग्राफी सेंटरचा अनियमितेचा अहवाल न पाठविण्यासाठी अमित सरदेसाईंनी तक्रारदाराकडे 10 हजार रुपयांची मागणी केली. ही रक्कम तडजोडीनंतर पाच हजार ठरली.

Pune Crime : भोर उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी अमित सरदेसाईंवर गुन्हा दाखल
वार्ड प्रमुखाला अनेक महिने ओलीस ठेवल्याचा आमदारावर आरोप.Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 09, 2022 | 1:10 AM

पुणे : पुण्यातील भोरमध्ये सोनोग्राफी सेंटर (Sonography Center)चा अनियमितता अहवाल देण्यासाठी डॉक्टरकडून लाच घेतल्याने, भोर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक (Medical Officer) अमित सरदेसाई यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराकडून 5 हजाराची लाच घेतल्यानंतर लाचलुचपत खात्याच्या अधिकाऱ्यांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील तक्रारदार भोरमध्ये वैद्यकीय व्यवसाय करतात. त्यांच्या रुग्णालयातील सोनोग्राफी सेंटरची तपासणी भोर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक करत असतात. (Case filed against Amit Sardesai, Medical Officer, Bhor Sub-District Hospital)

5 हजाराची लाच स्विकारताना रंगेङाथ पकडले

या सोनोग्राफी सेंटर बाबतचा अवहाल वैद्यकीय अधीक्षकांना पाठवायचा असतो. मात्र तक्रारदाराच्या सोनोग्राफी सेंटरचा अनियमितेचा अहवाल न पाठविण्यासाठी अमित सरदेसाईंनी तक्रारदाराकडे 10 हजार रुपयांची मागणी केली. ही रक्कम तडजोडीनंतर पाच हजार ठरली. याची तक्रार संबंधिताने लाचलुचपत विभागाकडे केली. तक्राराने दिलेली 5 हजाराची रक्कम वैद्यकीय अधीक्षकांनी स्विकारल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पुणे विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे या संबंधी पुढील तपास करत आहेत.

सोलापूरमध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

सोलापूर शहर पोलिस दलातील एका सहाय्यक पोलिस निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतलं आहे. गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप या सहायक पोलीस निरीक्षकावर आहे. दिनेश श्रीकांत कुलकर्णी असे लाचेची मागणी करणाऱ्या सहाय्यक पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. या संदर्भात तक्रारदाराने सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार सापळा रचून कुलकर्णी याच्यावर कारवाई करण्यात आली.

तक्रारदाराच्या विरोधात सोलापुरातल्या जोडभावी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल असून त्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलकर्णी हे करत होते. या गुन्ह्यात तक्रारदार यांच्या नातेवाईकाला देखील आरोपी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जर नातेवाईकांना या गुन्ह्यात आरोपी करू नये असे वाटत असेल तर एक लाख रुपये द्यावे अशी मागणी सपोनि कुलकर्णी यांनी केली होती. तडजोडीअंती 50 हजार रुपये घेण्याचे ठरले होते. (Case filed against Amit Sardesai, Medical Officer, Bhor Sub-District Hospital)

इतर बातम्या

Solapur Crime : सोलापूरमध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

Law and Order : पोलीस स्टेशनमधलं सगळ्यात मोठं पद कोणतं असतं माहीत आहे? चला जाणून घेऊया!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.