‘आतापर्यंत तू झोपली होतीस का?’ असभ्य बोलणे शिक्षण संचालक डॉ धनराज माने यांना भोवले ; वाचा संपूर्ण प्रकरण

डॉ धनराज माने हे पुण्यातील उच्च शिक्षण संचालनालय येथे शिक्षण संचालक पदावर कार्यरत आहेत. डॉ माने यांच्या कार्यालयातील लिपिक महिला फाईल वर संचालकांच्या सह्या घ्यायला गेल्या असताना सर्वांसमोर त्यांनी 'आतापर्यंत तू झोपली होतीस का ? नालायक ,मूर्ख ' असं असभ्य आणि उर्मट एकेरी भाषा वापरत मोठ्या आवाजात वापरून भयभीत केले.

'आतापर्यंत तू झोपली होतीस का?' असभ्य बोलणे शिक्षण संचालक डॉ धनराज माने यांना भोवले ; वाचा संपूर्ण प्रकरण
डॉ धनराज माने

पुणे- उच्च शिक्षण संचालनालयातील महिला लिपिकाशी असभ्य भाषेत बोलणे शिक्षण संचालक डॉ धनराज माने यांना चांगलंच महागात पडलं आहे.  राज्यपाल नियुक्त माजी आमदार बर्ट्रांड मुल्लर(अकोला) यांच्या तक्रारीच्या पत्रावर मुंबई उच्च न्यायालयानं याप्रकरणी माने यांची चौकशी करण्याचे निर्देश शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना दिले आहेत.

आतापर्यंत तू झोपली होतीस का ? उर्मट भाषेत केला अपमान डॉ धनराज माने हे पुण्यातील उच्च शिक्षण संचालनालय येथे शिक्षण संचालक पदावर कार्यरत आहेत. डॉ माने यांच्या कार्यालयातील लिपिक महिला फाईल वर संचालकांच्या सह्या घ्यायला गेल्या असताना सर्वांसमोर त्यांनी ‘आतापर्यंत तू झोपली होतीस का ? नालायक ,मूर्ख ‘ असं असभ्य आणि उर्मट एकेरी भाषा वापरत मोठ्या आवाजात वापरून भयभीत केले. त्यानंतर माने यांच्या वर्तणुकीविरोधात येथील कर्मचारी वर्गाने लेखणी बंद आंदोलन केले. हृदयविकार शस्त्रक्रिया झालेल्या संबंधित लिपिक महिलेने मुख्यमंत्र्यांपासून अनेक ठिकाणी या प्रकरणी तक्रारी केल्या.

महिला कर्मचाऱ्याबरोबर केलेलया गैरवर्तनाची दखल घेत माजी आमदार बर्ट्रांड मुल्लर यांनी घेतली. मुल्लर यांनी जुलै 2021मध्ये उच्च न्यायालयाकडं तक्रारीचं पत्र (ईमेल )पाव ठवून माने यांच्या विरोधात दाद मागितली. त्यावर उच्च नायायालयाने 11 ऑक्टोबर 2021 रोजी याप्रकरणी माने यांची चौकशी करण्याचे निर्देश शिक्षण विभागाच्या जन तक्रार कक्षाच्या प्रधान सचिवांना दिले आहेत. त्याची प्रत या आठवड्यात मुल्लर यांना नुकतीच प्राप्त झाली .

तक्रार मागे घेण्यासाठी कर्मचाऱ्यांवर दबाव ‘डॉ धनराज माने यांनी कर्मचारी वर्गाशी केलेल्या उर्मट,असभ्य वर्तणुकीच्या अनेक यापूर्वीही आल्या तक्रारी आहेत.तक्रारदारांना ते भीती दाखवून तक्रार मागे घ्यायला लावत असत.मात्र,हे प्रकरण कळताच तक्रार मागं घेतली जाऊ नये म्हणून मी उच्च नायायालयात दाद मांगितली.न्यायालयानं चौकशीचे निर्देश दिले असून लवकरच अहवाल समोर येईल. यापूर्वीही इतर अनेक प्रकरणात माने यांच्यावर निलंबनाची कारवाई झालेली आहे, अशी माहिती माजी आमदार बर्ट्रांड मुल्लर यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या:

पुढील दोन दिवस पुण्यात पाऊस, हवामान खात्याची माहिती; अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना फटका

धक्कादायक! पुण्यात तेराव्या मजल्यावरून वेटरने मारली उडी; आत्महत्येपूर्वी केले फेसबूक लाईव्ह

Nagpur | भाजप नगरसेवक छोटू भोयर काँग्रेसच्या वाटेवर, पक्षश्रेष्ठींच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

Published On - 11:12 am, Mon, 22 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI