आई-वडिलांच्या भांडणात मध्यस्थी, बापाकडून मानेवर कोयत्याने वार, बारामतीत तरुणाचा मृत्यू

कातकरी म्हणून काम करणाऱ्या वडिलांनीच सावत्र मुलाची हत्या केली. लाकडं तोडण्यासाठी लागणाऱ्या कोयत्याने मानेवर वार करुन बापाने मुलाचा जीव घेतला. मुलगा आई वडिलांचे भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करत असल्याची माहिती आहे.

आई-वडिलांच्या भांडणात मध्यस्थी, बापाकडून मानेवर कोयत्याने वार, बारामतीत तरुणाचा मृत्यू
बारामतीत तरुणाची बापाकडून हत्या

बारामती : आई वडिलांचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या सावत्र मुलाची बापानेच हत्या केली. लाकडं तोडण्यासाठी लागणाऱ्या कोयत्याने मानेवर वार करून बापाने मुलाचा जीव घेतला. बारामती तालुक्यात शिपकुले वस्तीवर हा प्रकार घडला.

काय आहे प्रकरण?

कातकरी म्हणून काम करणाऱ्या वडिलांनीच सावत्र मुलाची हत्या केली. लाकडं तोडण्यासाठी लागणाऱ्या कोयत्याने मानेवर वार करुन बापाने मुलाचा जीव घेतला. मुलगा आई वडिलांचे भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करत असल्याची माहिती आहे.

नेमकं काय घडलं?

हत्या केल्याची घटना पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील पारवडी येथील शिपकुले वस्तीवर घडलीय आहे. कोयत्याचा घाव जोरात बसल्याने मुलाचा यात जागीच मृत्यू झाला. गोपीनाथ मारुती जाधव (वय वर्षे 18 )असे मयताचे नांव आहे.

एक तासाच्या आत अटक

आरोपी मारुती जाधव (वय 45 वर्ष) असे आरोपीचे नाव असून त्याला बारामती तालुका पोलिसांनी एक तासाच्या आत अटक केली आहे. त्याच्यावर भादंवि कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक महेश ढवाण करीत आहेत.

संबंधित बातम्या :

डोक्यात धारदार शस्त्राने वार, शेतात तरुणाचा मृतदेह, इचलकरंजीत खळबळ

कारला धडकून बाईकसह तरुण गेला फरफटत, नाशकात भीषण अपघात, संतप्त जमावाने गाडी पेटवली

लग्नाला दहा वर्षे झाली, दोन मुलं, पण महिलेची टेरेसवरुन उडी, आत्महत्येमागचं नेमकं कारण काय?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI