दोन्ही मुली झाल्याने पतीचा संताप, पुण्यात महिलेला नग्न करुन भोंदूबाबाचा अंगारा फासला

पीडित महिलेला मुलगा व्हावा म्हणून तिला कामशेतमधील एका भोंदूबाबाकडे नेलं. काही अंगारा घरी देत पीडित महिलेला नग्नावस्थेत उभं करुन तिच्या संपूर्ण शरीरावर अंगारा आणि हळद कुंकू फासले

दोन्ही मुली झाल्याने पतीचा संताप, पुण्यात महिलेला नग्न करुन भोंदूबाबाचा अंगारा फासला
महिलेचा छळ केल्याप्रकरणी सासूला अटक, पती फरार

पिंपरी चिंचवड : दोन्ही मुली झाल्या आणि सासू-सासऱ्यांनी लग्नात योग्य मानपान केला नाही, याचा राग मनात धरुन पतीने पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. मुलगा होण्यासाठी कामशेतमधील भोंदूबाबासमोर बसवून महिलेला अंगारा खायला लावल्याचाही आरोप आहे. तर घरी नेऊन नग्नावस्थेत महिलेच्या शरीरभर अंगारा फासल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

तक्रारदार महिलेला दोन्ही मुली झाल्या आणि लग्नात तिच्या आई-वडिलांनी आपले योग्य मानपान केले नाही, म्हणून पतीने वेळोवेळी पत्नीला हात आणि लाथाबुक्क्यांनी पोटात मारहाण केली. तसेच पीडित महिलेला मुलगा व्हावा म्हणून तिला कामशेतमधील एका भोंदूबाबाकडे नेलं. त्याच्यासमोर बसवून पीडितेला अंगारा खायला लावला. तसंच काही अंगारा घरी देत पीडित महिलेला नग्नावस्थेत उभं करुन तिच्या संपूर्ण शरीरावर अंगारा आणि हळद कुंकू फासले. तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत तिचा छळ केल्याचा आरोप आहे.

पती, सासू आणि भोंदूबाबावर गुन्हा

या प्रकरणी पुण्यातील चाकण म्हाळुंगे पोलीस ठाण्यात पती ऋषिकेश बोत्रे, सासू प्रमिला बोत्रे आणि भोंदूबाबा बबन पवार यांच्यावर जादूटोणा प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पती ऋषिकेश बोत्रे फरार झाला, तर सासू प्रमिला बोत्रे आणि भोंदूबाबा बबन पवार या दोघांना चाकण म्हाळुंगे पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत

संबंधित बातम्या :

पूजेच्या नावाखाली बोलावून बलात्कार, महिला भक्ताच्या आरोपानंतर मुंबईत भोंदूबाबाला बेड्या

मुंबईत 21 वर्षीय गायिकेवर बलात्कार, भोंदूबाबाला अटक

गुप्तधन आणि पुत्रप्राप्तीचे आमिष, भोंदूबाबाकडून एका मुलीवर बलात्कार, कुटुंबातील तिघींचा विनयभंग

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI