AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात मयत गुंडाच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन, तलवार-पिस्तुलीसह डान्स, 22 वर्षीय तरुणाला अटक

भावेश कांबळे या पुण्यातील सराईत गुंडाचा गेल्या वर्षी खून झाला होता. मात्र त्याची पिलावळ अजूनही दहशत माजवण्यासाठी तलवार घेऊन डान्स करताना दिसत आहे. भावेश कांबळेचा वाढदिवस साजरा करताना टोळक्याने तलवारी आणि पिस्तूल हवेत फिरवत सेलिब्रेशन केले.

पुण्यात मयत गुंडाच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन, तलवार-पिस्तुलीसह डान्स, 22 वर्षीय तरुणाला अटक
पुण्यात मयत गुंडाच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन
| Edited By: | Updated on: Aug 06, 2021 | 11:37 AM
Share

पुणे : पुण्यातील हत्या झालेल्या सराईत गुंडाच्या वाढदिवसाला त्याच्या टोळक्यातील सदस्यांनी तलवारी आणि पिस्तूल हवेत फिरवत सेलिब्रेशन केले. शस्त्र वापरुन दहशत माजवल्या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. मयत गुंड भावेश कांबळेच्या नावाने घोषणाबाजी करत टोळक्याने तलवार-पिस्तुल नाचवलं होतं.

काय आहे प्रकरण?

भावेश कांबळे या पुण्यातील सराईत गुंडाचा गेल्या वर्षी खून झाला होता. मात्र त्याची पिलावळ अजूनही दहशत माजवण्यासाठी तलवार घेऊन डान्स करताना दिसत आहे. भावेश कांबळेचा वाढदिवस साजरा करताना टोळक्याने तलवारी आणि पिस्तूल हवेत फिरवत सेलिब्रेशन केले. हातात शस्त्र घेऊन दहशत निर्माण करणाऱ्यांपैकी एकाला गुन्हे शाखेच्या युनिट दोनने अटक केली. त्याच्याकडून एक गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. अक्षय उर्फ प्रसाद शशिकांत कानिटकर (वय 22 वर्ष, रा. बिबवेवाडी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

गेल्या वर्षी सराईत गुन्हेगार भावेश कांबळे याची हत्या झाली होती. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. खून झालेल्या आरोपीचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी सात जुलै रोजी 10 ते 15 जण जमले होते. त्यांनी हातात शस्त्र घेऊन दहशत निर्माण केली होती. तसेच, आरोपीच्या नावाने घोषणाबाजी केली होती.

जमलेल्या टोळक्यामध्ये अक्षय कानिटकर देखील होता. तो बिबवेवाडीतील दत्त मंदिराजवळ असल्याची माहिती पोलिस कर्मचारी उत्तम तारू व मितेश चोरमाले यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या पथकाने त्याला अटक केली. त्याच्याकडून एक गावठी कट्टा जप्त केला आहे. त्याला पुढील कारवाईसाठी बिबवेवाडी पोलिसांकडे दिले आहे.

संबंधित बातम्या :

मयत म्होरक्याच्या जन्मदिवशी ‘रावण’ टोळी शस्त्रांसह जमली, पुण्यात सहा जणांना अटक

बोनेटवर बसून तलवारीने केक कापला, साताऱ्यात गुंडाचा धिंगाणा, रस्त्यात गाणी लावून बर्थडे सेलिब्रेशन

पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.